यशवंत पंचायत राज अभियानाअंतर्गत सन २०१९-२० मध्ये झालेल्या मूल्यांकनानुसार पुरस्काराची नुकतीच घोषणा झाली आहे. विभागस्तरीय समितीने सर्व विभागात केलेले काम, व्यवस्थापन, बैठक, रेकॉर्ड, आदींची तपासणी केली होती. तसेच आरोग्य, बांधकाम, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, रोहयो, शिक्षण, ग्रामपंचायतींची विकासकामे, शासन योजनांची अंमलबजावणीची पाहणी केली होती. त्यानंतर राज्यस्तरीय समितीने पाहणी केली होती. त्यानुसार शासनास अहवाल सादर केला होता.
सदरील तपासणी ही ३०० गुणांची हाेती. विभागीय समितीने पंचायत समितीचे मूल्यमापन केल्यानंतर राज्यस्तरीय समितीकडून मूल्यमापन झाले. त्यात मराठवाड्यात पंचायत समितीने अव्वल स्थान मिळविले आहे.
सामूहिक प्रयत्नांचे यश...
पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे. शासन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणीबरोबर अन्य कामे अतिशय व्यवस्थितपणे करण्यात आली आहेत. पुढील वर्षी राज्यस्तरावर पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- श्याम गोडभरले, गटविकास अधिकारी.