शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनाची लातूर मनपाकडून जोरदार तयारी, शहरात १३ ठिकाणी संकलन केंद्र

By हणमंत गायकवाड | Updated: September 8, 2022 17:58 IST

लातूर शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्तीचे दान करावे, असे आवाहन मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी केले आहे. 

लातूर : पाणीटंचाईनंतर लातूर शहरामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याऐवजी मूर्ती संकलन करून मनपाच्या वतीने एकत्रित विसर्जन केले जात आहे. त्यानुसार यंदा लातूर शहरात १३ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रांवर मूर्ती संकलित करून १२ नंबर पाटी येथील खदाणीत शुक्रवारी विसर्जन केले जाणार आहेत. त्यासाठी मनपाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. 

लातूर शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्तीचे दान करावे, असे आवाहन मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी केले आहे. दरवर्षी श्री गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील तीर्थकुंड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विहीर तसेच बांधकाम भवन परिसरातील विहीर येथे विसर्जन केले जात असे. या ठिकाणापर्यंत काही मिरवणुका जातील. तेथे आरती होईल. कृत्रिम तलावाची निर्मिती करून छोट्या मूर्तींचे विसर्जन केले जाईल. मोठ्या मूर्तींचे मात्र संकलन केले जाणार आहे. 

या ठिकाणी आहेत संकलन केंद्र लातूर महानगरपालिकेने १३ ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्र स्थापन केले आहेत. पाण्याची टाकी, विवेकानंद चौक, यशवंत शाळा नांदेड रोड, मनपा शाळा क्र. ९ (मंठाळे नगर), श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, शासकीय विहीर (जिल्हाधिकारी कार्यालय परिसर), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (पाण्याची टाकी बार्शी रोड), दयानंद कॉलेज पार्किंग परिसर, सरस्वती कॉलेज (बार्शी रोड लातूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, बांधकाम भवन, खंदाडे नगर (कव्हा रोड), यशवंत शाळा (साळे गल्ली) तसेच तिवारी यांची विहीर या १३ ठिकाणी विसर्जनासाठी मूर्ती संकलन केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. 

पोलीस बंदोबस्तात विसर्जन शुक्रवारी ‘श्रीं’चे विसर्जन होत असून, पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. विसर्जन मिरवणुकादरम्यान बंदोबस्त राहणार आहे. पोलिसांच्या वतीने व्हिडिओ चित्रिकरण होणार असून, शहरात ठिकठिकाणी कॅमेऱ्यांची सोय करण्यात आली आहे. उत्साही वातावरणात ‘श्रीं’चे विसर्जन करण्यासाठी गणेशभक्तांनी सहकार्य करावे. शांततेत विसर्जन करावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :laturलातूरGanesh Mahotsavगणेशोत्सव