शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Latur: पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या हरिणाचा अपघातात मृत्यू, श्वानांनी केला पाठलाग

By आशपाक पठाण | Updated: May 24, 2023 18:09 IST

Latur: उन्हाचा पारा ४१ अंशावर जात असल्याने माणसं पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. अनेकजण उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. दुपारच्या वेळी तर शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट पहायला मिळत आहे.

- आशपाक पठाणलातूर : उन्हाचा पारा ४१ अंशावर जात असल्याने माणसं पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. अनेकजण उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. दुपारच्या वेळी तर शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट पहायला मिळत आहे. जिथे माणसं बेचैन झाली तिथे मुक्या जिवांचे काय. चाकूर तालुक्यातील घरणी ते आष्टामोड शिवारात पाण्याच्या शोधात भटकंती करीत असलेल्या एका हरिणाचा श्वानांनी पाठलाग केला. रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या हरिणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली.

लातूर शहर वाहतूक शाखेचे पथक घरणी-आष्टामोड मार्गावर ओव्हरस्पीडच्या केसेस करीत थांबले होते. जवळपास अर्ध्या तासापासून एक हरीण पाण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करीत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी पाहिले. त्याचवेळी एकट्या हरिणाला पाहून काही श्वानांनी त्याचा पाठलाग सुरू केला. उन्हामुळे पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या हरिणाने श्वानापासून सुटका करून घेत मुख्य मार्ग गाठला. पण रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या एका वाहनाने त्याला जोराची धडक दिली. याबाबतची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्मचारी दिलीप राजुळे यांनी जखमी हरिणाच्या जवळ गेले. त्यांच्या गाडीत असलेला कपड्याने जखमी हरिणाच्या पोटाला बांधले. बाटलीत असलेले पाणीही पाजले. जखमीला तात्काळ मदत मिळेल म्हणून पक्षीमित्र महेबूब चाचा यांनाही फोन केला. मात्र, काही वेळातच जखमी हरिणाचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती वन परिमंडळ अधिकारी सचिन रामपुरे यांना देण्यात आली. त्यांनी चाकूरच्या वनअधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यावर काही वेळातच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. पंचनामा करून मयत हरिणाला घेऊन गेले. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दिलीप राजुळे यांनी घटनेनंतर तत्परता दाखविल्याने त्यांचे वरिष्ठांनी कौतुक केले.

शेतशिवारात वन्य प्राण्यांसाठी पाणी ठेवा...उष्णता वाढल्याने पक्षी, प्राणी पाण्यासाठी व्याकूळ होऊन भटकंती करीत आहेत. शेतात ज्यांच्याकडे विहीर, बोअर आहे, पाण्याची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांनी मुक्या प्राण्यांना पाणी पिता येईल, यासाठी सोय करावी. तसेच वनविभागाने यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पाण्याच्या शोधात भटकंती करीत असलेल्या त्या हरिणाला पाणी मिळाले असते तर कदाचित अपघात झाला नसता, असे पक्षीमित्र महेबूब चाचा यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर