शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, लातूर संघाला अजिंक्यपद

By admin | Updated: October 6, 2015 00:58 IST

राज्य बालगट व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धा

मुरगूड : बाचणी (ता. कागल) येथे दिशा अकॅडमी व आदर्श क्रीडा मंडळ आयोजित राज्य बालगट व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धेत मुलींत कोल्हापूर, तर मुलांत लातूर विभागाने बाजी मारली. अंतिम सामन्याच्या कालावधीमध्ये पावसाच्या व्यत्ययाने मुलींच्या गटात कोल्हापूर व पुणे या दोन्ही संघांची संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी पाहून अधिक गुणाने कोल्हापूर संघास विजयी घोषित केले. तर मुलांत लातूर व कोल्हापूर या संघांचीही स्पर्धेतील संपूर्ण कामगिरी पाहून गुणाने लातूर संघास विजयी घोषित करण्यात आले. यावेळी अजिंक्य संघास जि. प. अध्यक्षा सौ. विमल पाटील व कोल्हापूरच्या महापौर सौ. वैशाली डकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पारितोषिक वितरण समारंभास शिवाजी शिक्षण संस्था कराडचे सचिव प्रकाश पाटील व कोजिमाशिचे सदस्य राजेंद्र रानमाळे, शंकरराव पाटील वरिंगेकर, विजय डांगले, शशिकांत कुलकर्णी, पांडुरंग पाटील (तात्या), शिवाजी डकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आदर्श क्रीडा मंडळाचे खेळाडू व सदस्य, मराठा महासंघाचे सर्व सदस्य, गावातील अन्य विविध संस्थांचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेतून निवडलेल्या मुला-मुलींच्या संघाचे राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर दिशा अकॅडमी बाचणी येथे दि. ९ आॅक्टोबर ते १२ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत संपन्न होत आहे. समारंभाचे प्रास्ताविक व्हॉलिबॉल प्रशिक्षक अजित पाटील, तर आभार एम. आर. पाटील विद्यानिकेतन, ज्युनि. कॉलेज प्राचार्या सौ. अरुणा पाटील यांनी मानले.