शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीत पुन्हा खटखट; मशीन दुरुस्तीसाठी पैसे नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST

लातूर : कोरोनाच्या संकटावर मात करून एस. टी. रुळावर येत असतानाच तिकीट मशीन बिघडल्याने वाहकांना आता पुन्हा हातात ट्रे ...

लातूर : कोरोनाच्या संकटावर मात करून एस. टी. रुळावर येत असतानाच तिकीट मशीन बिघडल्याने वाहकांना आता पुन्हा हातात ट्रे घेऊन खटखट करावी लागत आहे. मशीन खरेदी व दुरुस्तीसाठी पैसे नसल्याने वाहकांना आता ट्रे शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

लातूर जिल्ह्यात एकूण पाच आगार असून, या पाच आगारांमध्ये २४२ तिकीट मशीन आणि ३५२ ट्रे कार्यान्वित आहेत. एकूण ५९४ मशीन आणि ट्रे घेऊन वाहक काम करत आहेत. जिल्ह्यातील ५०५ बसेसपैकी ३२७ बसेस सध्या धावत आहेत. त्यांच्या १,६२१ फेऱ्या होत असून, दिवसाला ३० लाखांचे उत्पन्न एस. टी.ला मिळत आहे. जवळपास १५ लाखांचा तोटा कोरोनानंतर एस. टी. सहन करत आहे. त्यामुळे एस. टी.कडे मशीन खरेदी व दुरुस्तीला पैसे नसल्यामुळे वाहकांच्या हाती आता ट्रे तिकीट बॉक्स आला आहे.

दुष्काळात तेरावा

५०५ बसेसपैकी फक्त ३२७ बसेस सुरू आहेत. तब्बल १७८ बसेस अद्यापही बंद आहेत. त्यामुळे दिवसाला १५ लाखांचे उत्पन्न घटले आहे. लांबपल्ल्याची, रातराणी, जिल्हांतर्गत व परराज्यात सेवा सुरू असली, तरी पूर्ण क्षमतेने एस. टी. धावत नसल्याने तोटा सहन करावा लागत आहे.

आकड्यांची पुन्हा जुळवाजुळव

तिकीट मशीनवर वाहकांना हिशेब करणे सोपे जात होते. प्रवाशाला तिकीट देतानाही अडचण येत नव्हती. परंतु, आता मशीन नसल्यामुळे आकड्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे.

सध्या काही वाहकांचे मशीनवर तर काहींचे ट्रेवर काम सुरु आहे. ज्या कंपनीकडून मशीन घेतल्या होत्या, त्या कंपनीचा करार संपला आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. पुन्हा नव्याने मशीन सुरू होतील. - सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक