उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी सैनिक प्रमोद खंदाडे यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले होते. या वेळी व्यंकटराव मरलापल्ले, ज्ञानोबा गुरमे, डी.एन. मुंडे, सतीश बरुरे, जी.एस. सूर्यवंशी, केरबा सूर्यवंशी, व्यंकट मरेवाड, चंद्रकांत मुंडे, गणेश मुंडे, अमोल गोटमुकले, पंडित सूर्यवंशी, मधुकर जाधव, भागवत बटेवाड, चंद्रकांत कांबळे, श्रावण सूर्यवंशी, पांडुरंग गुळवे, अण्णाराव सूर्यवंशी, नवनाथ कांबळे आदी उपस्थित होते. या वेळी लायन्स नेत्र रुग्णालय व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती समितीच्या वतीने २० नागरिकांच्या घरी जाऊन नेत्र तपासणी करण्यात आली.
अण्णा भाऊंच्या साहित्यातून शोषित, उपेक्षितांना न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST