शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरापासून गायब असलेल्या दोन बहिणीचा जावयानेच केला खून (सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:24 IST

लामजना गावानजीक असलेल्या गोटेवाडी शिवारात शेवंताबाई ज्योतिबा सावळकर (८२), त्रिवेणीबाई सगन सोनवणे (८५ दोघेही रा. लामजना) या दोघी बहिणी ...

लामजना गावानजीक असलेल्या गोटेवाडी शिवारात शेवंताबाई ज्योतिबा सावळकर (८२), त्रिवेणीबाई सगन सोनवणे (८५ दोघेही रा. लामजना) या दोघी बहिणी राहत होत्या. ७ जुलै रोजी त्या बेपत्ता झाल्या. घरातील साहित्यही अस्ताव्यस्त पडले होते, त्यामुळे अपहरण झाल्याची तक्रार ॲड. नवनाथ सोनवणे यांनी किल्लारी पोलीस ठाण्यात दिली. ११ जुलैपासून किल्लारी पोलीस शोध घेत होते. मात्र, दोघी बहिणी ज्या घरात राहत होत्या तेथील परिस्थिती पाहून मृत शेवंताबाई यांचे जावई राजू उर्फ त्र्यंबक गुरसिध्द नारायणकर (रा.लामजना) यांच्यावर संशय आला. कारण शेवंताबाई यांना मुलगा नसल्याने त्यांनी जमीन जावयाच्या नावावर न करता मुलीच्या नावे केली होती. नेमका हाच राग मनात धरून जावयाने कोयत्याने वार करून सासूचा खून केला. यावेळी मावस सासू असलेल्या त्रिवेणीबाई यांनी हा प्रकार बघितला असता पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचाही खून केला. दोघी बहिणींच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले. बाजूस असलेल्या शेततळ्यातील पाळूच्या कपारीत पुरून टाकले. पुन्हा कोणाला शंका येऊ नये, यासाठी एका गायीची हत्या करून त्या मृतदेहांवर पुरण्यात आल्याची कबुली आरोपीने पोलिसांनी दिल्याचे सांगण्यात आले. सपोउपनि. अमोल गुंडे, बीट जमादार सचिन उस्तुर्गे, आबा इंगळे यांनी आरोपीच्या शोधात पुणे, मुंबई आदी ठिकाणी चकरा मारल्या, शेवटी मुंबईच्या घाटकोपर येथून आरोपीस अटक करण्यात आली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नवले यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी प्रारंभी कलम ३६४ प्रमाणे होणाऱ्या तपासात ३०२ चे कलम वाढविण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितले.

पोलिसांनी खाक्या दाखवताच दिली कबुली...

संशयित आरोपी असलेल्या जावयास पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. खाक्या दाखवताच आरोपी राजू उर्फ त्र्यंबक गुरसिध्द नारायणकर याने हा गुन्हा आपणच केल्याची कबुली दिली. बुधवारपासून शेततळ्यात जेसीबीच्या साह्याने उकरण्याचे काम केले जात आहे. तळ्यात पाणी असल्याने बीट जमादार उस्तुर्गे व आबा इंगळे, दत्ता गायकवाड यांनी घटनास्थळी रात्र जागून काढली. गुरुवारी दुपारी मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक सानप यांनी शवविच्छेदन केले.