शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरापासून गायब असलेल्या दोन बहिणींचा जावयानेच केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:24 IST

लामजना गावानजीक असलेल्या गोटेवाडी शिवारात शेवंताबाई ज्योतिबा सावळकर (८२), त्रिवेणीबाई सगन सोनवणे (८५ दोघेही रा. लामजना) या दोघी बहिणी ...

लामजना गावानजीक असलेल्या गोटेवाडी शिवारात शेवंताबाई ज्योतिबा सावळकर (८२), त्रिवेणीबाई सगन सोनवणे (८५ दोघेही रा. लामजना) या दोघी बहिणी राहत होत्या. ७ जुलै रोजी त्यात बेपत्ता झाल्या. घरातील साहित्यही अस्ताव्यस्त पडले होते, त्यामुळे अपहरण झाल्याची तक्रार ॲड. नवनाथ सोनवणे यांनी किल्लारी पोलीस ठाण्यात दिली. ११ जुलैपासून किल्लारी पोलीस शोध घेत होते. मात्र, दोघी बहिणी ज्या घरात राहत होत्या तेथील परिस्थिती पाहून मृत शेवंताबाई यांचा जावई राजू उर्फ त्र्यंबक गुरसिद्ध नारायणकर (रा. लामजना) याचा संशया आला. कारण शेवंताबाई यांना मुलगा नसल्याने त्यांनी जमीन जावयाच्या नावावर न करता मुलीच्या नावे केली होती. नेमका हाच राग मनात धरून जावयाने कोयत्याने वार करून सासूचा खून केला. या वेळी मावस सासू असलेल्या त्रिवेणीबाई यांनी हा प्रकार बघितला असता पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचाही खून केला. दोघी बहिणींच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले. बाजूस असलेल्या शेततळ्यातील पाळूच्या कपारीत पुरून टाकले. पुन्हा कोणाला शंका येऊ नये, यासाठी एका गायीची हत्या करून त्या मृतदेहांवर पुरण्यात आल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले. स.पो.उप.नि. अमोल गुंडे, बीट जमादार सचिन उस्तुर्गे, आबा इंगळे यांनी आरोपीच्या शोधात पुणे, मुंबई आदी ठिकाणी चकरा मारल्या. शेवटी मुंबईच्या घाटकोपर येथून आरोपीस अटक करण्यात आली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नवले यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी प्रारंभी कलम ३६४ प्रमाणे होणाऱ्या तपासात ३०२ चे कलम वाढविण्यात आल्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितले.

पोलिसांनी खाक्या दाखवताच दिली कबुली...

संशयित आरोपी असलेल्या जावयास पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. खाक्या दाखवताच आरोपी राजू उर्फ त्र्यंबक गुरसिद्ध नारायणकर याने सदरील गुन्हा आपणच केल्याची कबुली दिली. बुधवारपासून शेततळ्यात जेसीबीच्या साह्याने उकरण्याचे काम केले जात आहे. तळ्यात पाणी असल्याने बीट जमादार उस्तुर्गे व आबा इंगळे, दत्ता गायकवाड यांनी घटनास्थळी रात्र जागून काढली. गुरुवारी दुपारी मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक सानप यांनी शवविच्छेदन केले.