जळकाेट येथे झालेल्या सोसायटी सभागृहाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी व्यंकट पवार यांची उपस्थिती हाेती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युवकांचे चंदन पाटील नागराळकर, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील दळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस फिरोज देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अल्पसंख्याक सचिव इम्तियाज शेख, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, पंचायत समितीच्या सदस्या आस्मा बिरादार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अशोक डांगे, धनंजय ब्रह्मंना, प्रशांत देवशेट्टे, अजय शेटकार, रूपेश चक्रे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद ब्रह्मंना, शहराध्यक्ष दस्तगीर शेख, व्यंकटराव गोळे, शिंगाडे, माजी प्राचार्य संपत शिंगाडे, श्याम डांगे, गोविंद भोसले, दिगंबर भोसले, नरसिंग डांगे यांची उपस्थिती हाेती. सूत्रसंचालन प्राचार्य संपत शिंगाडे यांनी केले. आभार गोविंद ब्रह्मंना यांनी मानले. बैठकीसाठी शहरातील कार्यकर्ते उपस्थित हाेते.
जळकोट नगरपंचायत निवडणूक आघाडी करून लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST