शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा सहभाग; लातूरकरांसाठी अभिमानाची बाब

By आशपाक पठाण | Updated: August 24, 2023 21:00 IST

नदी हत्तरगा येथील उमेश स्वामी यांचा समावेश

लातूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान ३ मोहिमेला खूप मोठे यश मिळाले. विक्रम लँडर हे यान चंद्राच्या दक्षिण गोलार्धात यशस्वीपणे लँड करण्यात आले. या अभिमानास्पद कामगिरीत लातूर जिल्ह्यातील नदी हत्तरगा (ता.निलंगा) येथील मूळचे रहिवासी असलेले उमेश रमेश स्वामी या शास्त्रज्ञाचा सहभाग राहिला आहे. ही लातूरकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. 

नदी हत्तरगा येथील रमेश स्वामी हे सैन्यदलात कार्यरत होते. त्यामुळे ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. त्यांना तीन मुले आहेत. त्यातील उमेश मोठा मुलगा आहे. १२ वी पर्यंतचे शिक्षण सैनिकी शाळेत झाले. त्यानंतर सोलापूर, पुणे येथे पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले. एमएस.सी मॅथ शिक्षण झाल्यावर सेट, नेट नंतर पीएच.डीही केली. पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात काही दिवस प्राध्यापक म्हणून काम केले. २०११ मध्ये इस्रोमध्ये बेंगलोर येथे उमेश स्वामी शास्त्रज्ञ म्हणून रूजू झाले. मागील १२ वर्षांपासून ते कार्यरत आहेत. चांद्रयान ३ मोहिमेत त्यांनी सहभाग नोंदविल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे वडील माजी सैनिक रमेश स्वामी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

मुलाच्या कामगिरीचा सार्थ अभिमान...आमचे मूळ गाव नदी हत्तरगा आहे. मी सैन्यदलात असल्याने पुण्यात स्थायिक झालो. मला तीन मुले असून दोन अभियंते आहेत. तर तिसरा उमेश स्वामी यांनी एमएससी मॅथचे शिक्षण पूर्ण केल्यावर पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात काही दिवस प्राध्यापक म्हणून काम केले. २०११ साली त्यांनी इस्रोत शास्त्रज्ञ म्हणून सेवा सुरू केली. चांद्रयान मोहिमेत लँडिग पूर्ण झाल्यावर सिग्नलच्या टीममध्ये त्यांचा सहभाग होता,त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे वडील रमेश स्वामी म्हणाले.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रो