यावेळी विभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांनी निलंगा तालुक्यातील राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राबविलेल्या कृषी यांत्रिकीकरण कांदा चाळ, शेड नेट हाऊस तसेच पोखरा योजनेंतर्गतच्या बीज प्रक्रिया केंद्राची व मनरेगा आणि भाऊसाहेब फुंडकर योजनेतील फळबाग लागवडीची पाहणी केली. विकेल ते पिकेल योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या तानाजी साठे यांच्या लाकडी तेल घाण्यास भेट दिली. नीळकंठ नाईक यांच्या शेततळ्याची पाहणी केली. माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या शेतावर संपूर्णत: सेंद्रिय पद्धतीने शेडनेटमध्ये कोथिंबीर पीक घेण्यात आले असून, त्याला भेट दिली. शिंगनाळ येथील विजयाबाई पाटील यांच्या शेतावर मनरेगांतर्गत झालेल्या आंबा लागवडीची पाहणी केली. कासार बालकुंदा येथील चिनुमिया पटेल यांच्या आंबा लागवडीची पाहणी केली. ठिबक संचाची तपासणी केली. हलगरा येथील व्यंकटेश शेतकरी विकास बचत गटातर्फे उभारण्यात आलेल्या बीजप्रक्रिया केंद्र, अन्नसुरक्षा कडधान्य योजनेंतर्गत उभारलेल्या १२०० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाची पाहणी केली. यावेळी आनंदराव गायकवाड, आशिष गायकवाड, संदीप घोडके, औराद तगरखेडा येथील शेडनेट ग्रुपचे शेतकरी बालाजी थेटे, पांडुरंग म्हेत्रे, पंकज बियाणी, राजकुमार रेड्डी, मंडल कृषी अधिकारी अनिल शेळके, रणजित राठोड, कृषी पर्यवेक्षक जीवन लखने, आर. व्ही. पवार, अजय रावते, कृषी सहायक पेटकर, दीपक कलबोने हे उपस्थित होते.
कृषी उपसंचालकांकडून विकेल ते पिकेल प्रकल्पाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST