कासार बालकुंदा येथील ग्रामपंचायतीत सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी पंचायत समिती विस्तार अधिकारी संजय आडे यांच्या उपस्थितीत सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. तालुक्याचे लक्ष लागलेल्या येथील सरपंचपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले हाेते. दरम्यान, एकूण १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत माजी सभापती हाल्लाप्पा कोकणे यांच्या काॅग्रेसप्रणित शेतकरी विकास पॅनलकडून १३ पैकी ७ उमेदवार विजयी झाले आहे. सरपंचपदासाठी प्रभावती नायब आणि उपसरंपच पदासाठी प्रदिप कोडे यांनी अर्ज दाखल करण्यात आले हाेते. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातुरे आणि नितीन पाटील यांच्या भाजपप्रणित परिर्वतन विकास पॅनलकडून १३ पैकी ६ उमेदवार निवडून आले होते. म्हणून सरपंच, उपसरपंच निवडीसाठी सिम्निंता बेस्ते आणि श्रीमंत मोरे यांनी अर्ज दाखल केले हाेते. यावर मतदान घेण्यात आले. यामध्ये बेस्ते आणि मोरे यांना ६ मते तर नायब आणि कोडे यांना ७ मते पडली. एका मताने त्यांना विजय घोषीत करण्यात आले. गत ४५ वर्षापासून ग्रामपंचायतीवर असलेली पकड माजी सभापती हाल्लाप्पा कोकणे यांना कायम ठेवली आहे. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे आणि नितीन पाटील यांनी पहिल्यांदाच आपले ६ उमेदवार निवडून आणले आहेत.
या निवडीद्दल ग्रामसेवक आर.सी.धर्मशेट्टी, आप्पासाहेब पाटील, गणपतराव कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्या रंजणाताई आचार्य, रावसाहेब कल्याणकर, अण्णा नायब, राम सुर्यवंशी, विश्र्वनाथरड्डी मरे, किशोर पाटील, तानाजी दरेकर, जनार्धन कोडे, माधवराव मेंडोळे, रहेमान शेख, बाबुराव सारगे, आतीश काळे, संजीव गोपाळे यांनी काैतुक केले आहे.