शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

२ हजार ३६५ क्विंटलची आवक; ९ हजारांचा उच्चांकी दर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST

लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी २ हजार ३६५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला ९ हजार १४१ ...

लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी २ हजार ३६५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला ९ हजार १४१ रुपयांचा कमाल, ७ हजार ८०० रुपये किमान, तर ९ हजार रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. दोन दिवसांपूर्वी सोयाबीनचा दर आठ हजारांवर होता, त्यामध्ये वाढ झाली असून, सोमवारी ९ हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला असून, या हंगामातील हा सर्वाधिक दर आहे.

सोमवारी लातूर बाजार समितीत गूळ १३४ क्विंटल, गहू १,८०१, हायब्रीड ज्वारी २८, रब्बी ज्वारी ५४३, पिवळी ज्वारी ९, हरभरा २,१५२, तूर १,८४७, मूग ८८, उरंडी २३, तर ९७ क्विंटल करडईची आवक झाली. गुळाला ३,१९५, गहू १,९००, हायब्रीड ज्वारी ९००, रब्बी ज्वारी १,८००, पिवळी ज्वारी २,२००, हरभरा ४,७५०, तूर ६,१८०, मूग ५,८००, करडई ४,८५०, एरंडी ४ हजार ५५०, तर सोयाबीनला ९ हजार रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. सद्यस्थितीत खरीप हंगामातील पिके बहरली असून, कोळपणी तसेच फवारणीची कामे सुरू आहेत. शेतकरी शेतीकामात व्यस्त असल्याने बाजारात शेतमालाची आवक घटली आहे. सोमवारी हरभरा २,१५२, तर तुरीची १,८४७ क्विंटलची आवक झाली. सोयाबीनच्या दरात वाढ झाली असून, त्या तुलनेत आवकही मंदावली असल्याचे बाजारातील चित्र आहे.

साठा मर्यादेमध्ये वाढ; दर वधारले...

केंद्र सरकारने मूगवगळता इतर कडधान्यांवर स्टॉक लिमिट करण्याबाबतच्या अधिसूचनेत बदल केला आहे. त्यामुळे साठा मर्यादेमध्ये वाढ झाली असून, कडधान्याचे दर वधारले आहेत. त्यातच आवक नसल्याने दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने साठा मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.