सूत्रसंचालन डॉ. संजय गवई यांनी केले, तर आभार डॉ. श्रीकांत गायकवाड यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रा. मनोहर कबाडे, प्रा. बी.एम. जाधव, डॉ. बाळासाहेब गोडबोले, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, प्रा. विजयकुमार धायगुडे, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. गोविंद पवार, प्रा. वनिता पाटील यांनी परिश्रम घेतले.
समाजाला महात्मा गांधीजींच्या विचाराची गरज...
समाजाला खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींच्या विचारांची गरज आहे. विचारांची प्रत्यक्ष कृती आपण सर्वांनी केली पाहिजे, असे डॉ. महादेवप्पा दडगे म्हणाले. यावेळी ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सोमनाथ रोडे म्हणाले, आजच्या शिक्षकांनी शीलवान, कर्तृत्ववान आणि समाजशील असले पाहिजे. त्यांनी १९४७ ते २०२० पर्यंतच्या भारत देशाच्या विकासाचा परिपाठ यावेळी मांडला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी केले.