शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

‘आयआयएम-एन’ देशातील सर्वोत्कृष्ट संस्था होणार

By admin | Updated: July 27, 2015 00:58 IST

आयआयएम-एन’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट-नागपूर) नवीन असले तरी येत्या काळात देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून तिचे नाव

नागपूर : ‘आयआयएम-एन’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट-नागपूर) नवीन असले तरी येत्या काळात देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून तिचे नाव असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘आयआयएम-एन’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेच्या पहिल्या बॅचमध्ये देशातील ५७ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला असून, पहिल्या सत्राची सुरुवात झाली आहे.या कार्यक्रमाच्या प्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘आयआयएम-अहमदाबाद’चे संचालक डॉ. आशिष नंदा, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, ‘व्हीएनआयटी’चे संचालक डॉ. विश्राम जामदार प्रामुख्याने उपस्थित होते. भारतातील ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’सारख्या संस्था तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यात आघाडीवर आहेत आणि हीच आज देशाची गरज आहे. जागतिक पातळीवर मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. घोषणा झाल्यापासून अगदी अल्प कालावधीतच ‘आयआयएम’ला सुरुवातदेखील झाली, ही अभिमानाची बाब आहे. यातून नागपूरचा विकास होईल, असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.