हे लागणार पुरावा...
लाभार्थ्यांना अर्ज भरून देताना रहिवासी पुरावा म्हणून गॅस जोडणी, बँक पासबुक, वीजबिल, वाहन परवाना, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, टेेलिफोन बिल तेही एक वर्षाच्या आतील जोडणे आवश्यक आहे. अर्ज भरून घेतल्यावर समिती त्याची छाननी करणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती...
अर्ज भरून घेतल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती काम करणार आहे. यात पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपनियंत्रक पुरवठा यांचा समावेश असणार आहे. एखादी शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने दिली असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
या कारणाने कार्ड होईल रद्द...
तुम्ही जर सहा महिन्यांपेक्षा अधिक दिवस धान्य घेतलेच नसेल, अर्ज भरून देताना त्यावर अपेक्षित खुलासा दिला नसेल किंवा तुमच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढले असेल. हयात नसलेल्या व्यक्तीच्या नावाने धान्य उचलण्यात येत असेल, अर्जासोबत आवश्यक पुरावे जोडण्यात आले नसतील तर तुमचे रेशनकार्ड रद्द केले जाईल.
.......................
तलाठ्यांमार्फत लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतले जात आहे. ही मोहीम ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे. अर्जासोबत आवश्यक पुरावे जोडावे लागतील. सदरील अर्जांची छाननी तहसीलदारमार्फत केली जाईल. एखाद्या लाभार्थ्यांचे उत्पादन १ लाखावर गेले असेल तर त्यांचे धान्य निलंबित केले जाणार आहे.
सदाशिव पडदुणे, जिल्हा पुरवठा अधिकारी.