शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दिंडीत आजारी पडलेल्या पत्नीला घरी घेऊन येताना पतीचा मृत्यू

By संदीप शिंदे | Updated: June 26, 2023 12:26 IST

माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील घटना    

निलंगा (जि. लातूर) : आषाढीसाठी पंढरपूरकडे जात असलेल्या पायी वारीत आजारी पडलेल्या पत्नीला दिंडीतून गावाकडे घेऊन येत असताना  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे घडली.

निलंगा तालुक्यातील आनंदवाडी गौर येथील बालाजी गणपती चामे यांच्या पत्नी सुनंदा या आनंदवाडी गावातून पंधरा दिवसांपूर्वी आळंदी ते पंढरपूर या पायी वारीत सहभागी झाल्या होत्या. पायी चालत असताना त्या आजारी पडल्या. आजारी असल्याचा निरोप गावाकडे देण्यात आला. त्यामुळे पत्नीला आणण्यासाठी  बालाजी चामे (वय ५९) हे रविवारी सकाळी आनंदवाडी गावातून बसने निघाले व माळशिरस तालुक्यातील वेळापूर या गावी असलेल्या पायी दिंडीतून पत्नीला घेऊन रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावाकडे ते निघाले.

बसस्थानकाकडे जाण्यासाठी एका ऑटोमध्ये बसत असताना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. त्यांना जवळील  रुग्णालयात दाखल केले असता ह्रदयविकाराच्या  धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बालाजी चामे यांच्यावर आनंदवाडी येथील स्मशानभूमीत  सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :laturलातूरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022