शंकरराव पाटील तळेगावकर यांनी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देवणी पंचायत समिती येथे आयुक्त कार्यालयनी तपासणी अहवालाचे वाचन व सुंदर माझे कार्यालय पहाणी दरम्यान आलेले उपायुक्त वैशाली रसाळ यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०२०-२१ मध्ये पीक विमा परिपूर्ण भरलेला आहे. पीक विमाच्या नुकसान भरपाईपोटी मिळणारी रक्कम एकाच गावातील काही शेतकऱ्याला हेक्टरी १७ हजार ४०० रुपयांप्रमाणे मिळाली आहे. तर शेजारच्या शेतकऱ्याला सारख्याच पीकाच्या नुकसान भरपाईपोटी म्हणून हेक्टरी केवळ ५०० रुपयांप्रमाणे मिळाले आहेत. देवणी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप एकही रुपयांचा विमा नुकसान भरपाईपोटी मिळालेला नाही. याबाबत संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीशी विचारणा केले असताृ याकडे कानाडोळा करीत वैयक्तिक शेतकऱ्यानी कंपनीच्या पोर्टलवर तक्रारी सादर करावेत, असे उत्तर मिळत आहे. देवणी तालुक्यातील बहुतांश शेतकरी अशिक्षीत असून, अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार दाखल करणे शक्य नाही. सध्या कामाच्या दिवसात शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा विनाकारण खर्च होणार आहे. याचा विचार करून सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळावा, असे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती शंकरराव पाटील तळेगावकर, माजी सभापती सत्यवान कांबळे, बाळासाहेब बिरादार, सोमनाथ बोरोळे उपस्थित होते.