शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे जळकोटातील शेकडो एकरवरील जमिनीची खरडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST

जळकोट : तालुक्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या शेकडो एकर जमिनीस फटका बसला आहे. पिकांबरोबर जमिनीची खरडण झाली आहे. ...

जळकोट : तालुक्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या शेकडो एकर जमिनीस फटका बसला आहे. पिकांबरोबर जमिनीची खरडण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. प्रशासनाने पाहणी करुन पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

जळकोट तालुक्यात यंदा मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे खरिपाची वेळेवर पेरणी झाली होती. दरम्यान, पिकांपुरता पाऊस झाल्याने पिकेही चांगली बहरली होती. गत महिन्यात जवळपास २५ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाने ताण दिला होता. त्यामुळे तालुक्यातील पिकांना काही प्रमाणात फटका बसला. अशातच रिमझिम पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या.

गत सोमवारी व मंगळवारी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. याशिवाय, नदीकाठच्या जमिनीची खरडण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे दगड गोट्यांचा थर साचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकरी चिंतातुर झाला आहे. तालुक्यातील रावणकोळा येथील शहाजी चव्हाण, हनुमंत चव्हाण यांच्या चार एकर जमिनीतील उसाचे पीक पूर्णतः वाहून गेले आहे. पाण्यातील विद्युत मोटर वाहून गेली.

तसेच तालुक्यातील रावणकोळा, जळकोट येथील काही घरांची पडझड झाली आहे. नारायण नाईकवाडे यांचे घर पडले आहे. डिग्रसजवळील पूल वाहून गेल्याने जळकोट- नांदेड संपर्क तुटला होता. तालुक्यातील जवळपास २० ते २२ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. डोंगरसांगवी, रावणकोळा, अतनूर, गुत्ती, मेवापूर, चिंचोली, होकर्णा येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील तिरु नदी दुथडी भरुन वाहत आहे.

तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, वीज बिल माफ करावे, सरसकट हेक्टरी ५० हजारांचे अनुदान द्यावे, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, महेश धुळशेट्टे, संग्राम नामवाड आदींनी केली आहे.