शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

HSC Result : लातूर विभागीय मंडळाचा ९९.६५ टक्के निकाल; ७७६४६ विद्यार्थी झाले उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 17:45 IST

HSC Result Latur Board : कोरोनामुळे यावर्षी लेखी परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारेच विद्यार्थ्यांचे गुणांकन करण्यात आले.

ठळक मुद्देलातूर विभागीय मंडळात नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची टक्केवारी ९९.६६ टक्के तर मुलांची टक्केवारी ९९.६४ टक्के आहे.

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुल्यांकनाद्वारे बारावी बाेर्ड परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात लातूर विभागीय मंडळाचा निकाल ९९.६५ टक्के लागला आहे. नांदेड ९९.७३, उस्मानाबाद ९९.३७ तर लातूर जिल्ह्याचा ९९.६९ टक्के निकाल लागला आहे.

कोरोनामुळे यावर्षी लेखी परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारेच विद्यार्थ्यांचे गुणांकन करण्यात आले. लातूर विभागीय मंडळात नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील ३२ हजार ५९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ३२ हजार ५०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या १४ हजार २१ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ९३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर लातूर जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या ३१ हजार ३०२ विद्यार्थ्यांपैकी ३१ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची टक्केवारी ९९.६६ टक्के तर मुलांची टक्केवारी ९९.६४ टक्के आहे.

विज्ञान शाखेतील ३४ हजार ७६२ विद्यार्थी उत्तीर्ण...लातूर मंडळांतर्गत विज्ञान शाखेतील ३४ हजार ७६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये नांदेड १५ हजार ५४, उस्मानाबाद ५ हजार ९०२ तर लातूर जिल्ह्यातील १३ हजार ८०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेत २८ हजार १०७, वाणिज्य शाखेत १० हजार ७०९ तर किमान कौशल्यावर अधारित अभ्यासक्रमाचे लातूर मंडळातील ४ हजार ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक...बारावी बोर्ड परीक्षेत लातूर मंडळात वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक ९९.९७ टक्के लागला आहे. कला शाखा ९९.८० टक्के तर विज्ञान शाखेचा ९९.४७ टक्के आणि किमान कौशल्यावर अधारित शाखेचा ९९.३४ टक्के निकाल लागला असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे सचिव सुधाकर तेलंग यांनी सांगितले.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालlaturलातूर