चाकूर पोलीस स्टेशन मधील सुभाष हरणे, परमेश्वर राख, अच्युत सूर्यवंशी यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून तर पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून साहेबराव हाके पाटील, संतोष साठे, बाळासाहेब चाटे तसेच पोलीस नाईक म्हणून अर्जुन तिडोळे, दत्तात्रय चामे, हनुमंत भुसे, सूर्यकांत मुंडे, संतोष हजारे, मुबारक मुल्ला यांना पदोन्नती मिळाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड यांचा सत्कार वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रामेश्वर हाके पाटील यांनी केला. तर पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार महासचिव रंगनाथ वाघमारे, सूर्यकांत कांबळे, ज्ञानोबा मोरे, उपाध्यक्ष जनार्दन शृंगारे, कोषाध्यक्ष व्यंकट भालेराव, शहर सचिव नामदेव कांबळे, रोहित कांबळे, समाधान कांबळे, बुद्धभूषण गायकवाड, आकाश शेळके, अण्णासाहेब कांबळे, हनुमंत शेळके, सिद्धार्थ गायकवाड, ऋषी कांबळे, पुष्पांक नाईकवाडे, गौतम कांबळे यांनी केला. प्रास्ताविक व आभार रंगनाथ वाघमारे यांनी केले. यावेळी पोलीस कर्मचारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पदोन्नती मिळालेल्या पोलिसांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST