वलांडी : देवणी तालुक्यातील जवळगा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत यश संपादन करून उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच हनुमंत बिरादार होते. यावेळी मुख्याध्यापक चव्हाण, माजी सरपंच रमेश वाघ, शाळा व्यवस्थापन समितीचे यशवंत सोनकांबळे, विठ्ठल केंद्रे, मनोज आलमले, परमेश्वर माळी, आनंद कदम आदी उपस्थित होते. येथील जिल्हा परिषद शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून, १५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. २०पैकी ७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यात आरती धनाजी जाधव, क्षीतिजा टोम्पे, प्रज्ञा सोनकांबळे यांचा समावेश आहे. सर्व गुणवंतांचे कौतुक होत आहे.