शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गृहखाते मुख्यमंत्र्यांना पेलवेत नाही : विखे-पाटील

By admin | Updated: September 9, 2016 20:15 IST

राज्यात पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. बदनापूरच्या पोलिस निरीक्षक विद्यानंद काळेंना भाजपाचा आमदार धमकावतो. सेनेचे कार्यकर्ते राजरोसपणे पोलिसांना मारतात.

ऑनलाइन लोकमत 
लातूर, दि. ९ -  राज्यात पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. बदनापूरच्या पोलिस निरीक्षक विद्यानंद काळेंना भाजपाचा आमदार धमकावतो. सेनेचे कार्यकर्ते राजरोसपणे पोलिसांना मारतात. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच पोलिसांवर हल्ला होतो. हे वाढते हल्ले पाहता गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेलवत नाही हेच सिध्द होते, अशी टिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे लातुरात केली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भेटीसाठी लातूर येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. 
ते पुढे बोलताना म्हणाले की, सत्ताधारीच पोलिसांवर तुटून पडत आहेत हे गंभीर आहे. शिवसेना सरकारला सत्तेत राहून विरोध करते. त्यांची ही नौटंकी आहे. सरकारवर टिका करण्यापेक्षा तुम्ही सरकारमधून बाहेर पडा. 
जलयुक्त शिवार ही आमच्या महात्मा फुले जलभूमी अभियानची कॉपी !
जलयुक्त शिवार योजना ही या सरकारची नाही. आमच्या सरकारने महात्मा फुले जलभूमी अभियान राबविले. त्याची या सरकारने कॉपी केली. मूळ कल्पना आमची. या सरकारने शब्द बदलून लोकांपुढे आणली आहे. राज्यातील सर्वात मोठे खोरे गोदावरी खोरे आहे. त्याची मजबुती होणे आवश्यक आहे. त्यासाठी सह्याद्री आणि ठाणे-मुंबईला पडणारे पावसाचे समुद्राला मिळते. ते पाणी बोगद्याचे सहाय्याने कृष्णा - गोदावरीच्या खोºयात सोडल्यास राज्याचा पाणीप्रश्न निकाली  निघणार आहे. यासाठी बोगदेच हवेत. जम्मू-कश्मीरमध्ये अनेक रस्ते बोगद्यातून गेले आहेत. लोणावळामार्गे मुंबईला जाणारा एक रस्ता ४० किमी बोगद्यातून जातो. पाणी आणायला अडचण काय आहे ? असा सवालही त्यांनी केला. लातूर जिल्ह्याची पाण्याची स्थिती चांगली नाही. यासाठी उजनीतून सीना कोळेगाव येथून पाणी पाईपलाईनने मांजरा धरणात सोडावे, अशी मागणीही त्यांनी केली. यासाठी आवश्यक त्या ठिकाणी लिफ्टींग झाले तरी पाणी द्या. कारवण टेंभू, म्हैसमाळ  या योजना लिफ्टींगनेच पूर्ण झाल्या आहेत. तिकडे होते मग मराठवाड्यासाठी का नाही ? असा सवालही त्यांनी केला. 
शिवराज पाटील चाकूरकरांशी विखे - पाटील यांची तीन तास  चर्चा 
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे कोणत्याही कार्यक्रमाशिवाय लातूरला आले होते. त्यांनी माझा हा दौरा खासगी असल्याचे सांगितले. या दौºयाला काहीही विषय नसून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची भेट घ्यायची होती. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठीच मी लातूरला आल्याचे ते म्हणाले. या भेटीत त्यांनी शिवराज पाटील चाकूरकरांशी मनसोक्त चर्चा केली. तब्बल तीन तास ही चर्चा चालू होती. नेमकी चर्चा काय झाली याचा तपशील काही मिळू शकला नाही. परंतु या चर्चेकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मात्र कान लागले होते.