शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक खजिना! उदगीरच्या किल्ल्यात दोन ट्रक तोफगोळ्यांसह ५ तोफाही सापडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 20:28 IST

सन १७६० साली उदगीर येथे निजाम व मराठे यांच्यात लढाई झाली. यात मराठ्यांचा विजय झाला.

- व्ही. एस. कुलकर्णीउदगीर: येथील ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता करताना बुरुजाखाली असलेल्या गुहेत जवळपास दोन ट्रक एवढा तोफगोळा आणि पाच तोफा सापडल्या आहेत. पानिपतची लढाई सुरू होण्यापूर्वी उदगीर येथे निजाम आणि पेशव्यांमध्ये युद्ध झाले होते. यामुळे या किल्ल्यास मोठे महत्व असून हा साठा १४व्या किंवा १५ व्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हिंदू साम्राज्य महासंघ हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी सावळे,सोलापूरचे किशोर माने,उस्मानाबादचे नागेश जाधव औरंगाबादचे दत्तू हाडोळे यांच्यासह २६ जिल्ह्यातील ८० स्वयंसेवकांच्या पथकाने  गेल्या चार दिवसांपासून उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या पथकाने स्वखर्चाने उदगीरला येवून किल्ल्यातील भिंतीवर वाढलेली झाडे ,झुडपे काढणे,किल्ल्यातील विहिरीचा गाळ काढून विहीर स्वच्छ करणे,गुहा स्वच्छ करणे,किल्ल्यातील भिंतीवर काढण्यात आलेली अश्लील चित्रे धुवून काढणे अशी कामे या पथकाकडून सुरू आहेत. 

दरम्यान, सोमवारी किल्ल्यातील बुरुजाखालील गुहेची स्वच्छता सुरू असताना जवळपास दोन ट्रकहून अधिक शिवकालीन तोफगोळा साठा आणि पाच तोफाही या पथकाला आढळून आल्या. या पथकाला सतीश उस्तुरे, प्रशांत मांगुळकर, विहिंपचे सतीश पाटील,सावन टांकसाळे, डॉ.प्रशांत राजूरकर रामचंद्र चव्हाण, अरविंद शिंदे यांनी सहकार्य केले.

चौदाव्या-पंधराव्या शतकातील तोफगोळा--सन १७६० साली उदगीर येथे निजाम व मराठे यांच्यात लढाई झाली. यात मराठ्यांचा विजय झाला. मराठ्यांचे नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी आपले सैन्य घेवून पानिपतकडे कूच केली. पानिपतच्या लढाईची सुरुवात उदगीरपासून झाल्यामुळे येथील लढाईस ऐतिहासिक महत्व आहे. या किल्ल्यात आढळून आलेला तोफगोळा हा चौदाव्या किंवा पंधराव्या शतकातील असावा असा अंदाज या पथकाचे प्रमुख शिवाजी पवार यांनी वर्तवला आहे.

२६ जिल्ह्यातून ८० स्वयंसेवकहिंदू साम्राज्य महासंघ हिंदुस्थानचे अध्यक्ष शिवाजी पवार व बनशेळकी(ता. उदगीर)चे कार्यकर्ते  शिवाजी सावळे यांची रायगडावर भेट झाली. उदगीरच्या किल्ल्याविषयी सावळे यांनी पवार यांना माहिती दिली. त्यामुळे राज्यातील २६ जिल्ह्यातील ८० स्वयंसेवक उदगीरच्या किल्ल्याच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले. असे शिवाजी पवार लोकमतशी बोलताना म्हणाले.

टॅग्स :laturलातूरFortगड