तेरणा नदीवरील बॅरेजेसचे दरवाजे उघडले...
तेरणा नदीवरील बॅरेजेस भरले असून, औराद, तगरखेडा येथील बॅरेजेसचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तब्बल पाऊण तास झालेल्या या पावसात जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक अंतर्गत रस्ते बंद झाले आहेत. दरम्यान, शेतशिवारांमध्ये कंबरेच्या वर पाणी आल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या पाऊण तासामध्ये ५५ मि.मी. पाऊस झाल्याने शेतशिवारांमध्ये ठेवलेले शेतीचे साहित्य वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मेघगर्जनेसह झालेल्या या पावसामुळे तेरणाकाठच्या गावांना मोठा फटका बसला आहे. औराद येथून जाणाऱ्या ७५२ राष्ट्रीय महामार्गावरून पाणी वाहत आहे.
औराद, तगरखेडा, शेळगी, सावरी, तांबाळा, तांबाळावाडी, बोरसुरी आदी गावांत अनेक घरांनी पाणी घुसले असून, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
कॅप्शन : तेरणा नदीवरील औराद शहाजानी येथील बॅरेजेस ओव्हरफूल झाला असून, दारे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
फोटो फाइल : १८एलएचपी-औराद शहाजानी