लातूर : तुम्ही लवकरात लवकर डी मॅट अकाऊंट काढा, त्या खात्यात एक लाख रुपये जमा करा, तुम्हाला दर महिन्याला १० हजार रुपये नफा मिळेल, असा फोन करून एका व्यक्तीच्या खात्यातून ९० हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना देवणी येथे घडली.
पोलिसांनी सांगितले, ९१२६६९३८७० या क्रमांकावरून विठ्ठल सुधाकर कुलकर्णी (रा. सय्यदपूर, ता. देवणी, जि. लातूर) यांना फोन आला. तुम्ही डी मॅट अकाऊंट काढा, त्यात एक लाख जमा करा, तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये नफा मिळतो, असे सांगितले. या अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कुलकर्णी यांनी अकाऊंट उघडून त्या अकाऊंटमध्ये थोडे थोडे करून ९० हजार रुपये भरले.
त्यानंतर त्यांच्या अकाऊंटवरून कुलकर्णी यांच्या संमतीशिवाय पैसे काढून फसवणूक केली, असे विठ्ठल कुलकर्णी यांनी देवणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध कलम ४२० भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सपोनि. शिनगारे करीत आहेत.