काेराेना काळात वाढल्या तक्रारी...
मार्च २०२० पासून काेराेनाचा काळ सुरू झाला. या काळात पुरुषांचा पत्नीकडून छळ झाल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. बहुतांश पती-पत्नीमध्ये माेबाइल हे प्रमुख वादाचे कारण आहे. साेशल मीडियातून हाेणारी चॅटिंग हा एकमेकातील संशय वाढविणारा विषय ठरला आहे. यातूनच मग गैरसमज आणि वाद घडत आहेत. परिणामी, पत्नीकडूनही पतीचा छळ झाला आहे.
आर्थिक टंचाई आणि अति सहवासातून छळ...
काही कुटुंबातील वादाचे कारण आर्थिक चणचण आहे. त्याचबराेबर काेराेनाकाळात अति सहवास लाभल्याने एकमेकांविषयी असलेली आदराची भावना कमी हाेणे. त्यातून झालेले वाद टाेकाला जाणे, ही कारणेही छळाला कारणीभूत ठरली आहेत.
पुरुषांच्या हक्कासाठी काेण लढणार...
पत्नी क्षुल्लक कारणावरून वाद, भांडण करते. अनेकदा सासरच्या मंडळींना सांगितले. त्यांचाही उपयाेग झाला नाही. अखेर महिला तक्रार निवारण केंद्राकडे धाव घेत समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी कायदेशीर कारवाई करण्यासाठी तशी तरतूदही नाही. मग पुरुषांच्या हक्कासाठी काेण लढणार, असा प्रश्न आहे.
- पत्नी पीडित
मानसिक छळच नव्हे तर मारहाणही करते।
१ बायकाेकडून मानसिक छळच नाही तर मारहाणही हाेत असल्याची तक्रार आहे.
२ याविराेधात पाेलीस ठाण्याकडे दाद मागितली; मात्र काही उपयाेग झाला नाही.
३ आता हा छळ सहन हाेत नाही. ताे थांबावा यासाठी घटस्फाेटाचा दावा केला आहे.