क्रांती विद्यालयात श्रद्धांजली कार्यक्रम
जळकोट : तालुक्यातील केकतसिदंगी येथील क्रांती माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक सदस्य गोविंदराव पाटील गोंड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विठ्ठल चंदावार, विश्वनाथ इद्रांळे, विश्वनाथ चाटे, विठ्ठल चंदावार, राजीव पाटील,जे.के. कांबळे, अच्युतराव दळवे, प्रशासक धुळे, ग्रामसेवक भालके, तलाठी भंडारे, मनोहर गोंड, मच्छिंद्रनाथ हंगरगे, ज्ञानोबा केंद्रे, भानुदास केंद्रे, विठ्ठल केंद्रे, फुलारी, ज्ञानोबा चाटे, प्रेमराव चाटे, परशुराम केंद्रे, बापुराव हंगरगे, लक्ष्मण काबंळे, काशिनाथ इंद्राळे, मुख्याध्यापक विलास सिंदगीकर, अंकुश सिंदगीकर, अरुण काळे, कैलास पाटील गोंड, देविदास मरशिवणे, माधव सोनकांबळे, जगन्नाथ दळवे, रमेश केंद्रे, केशव दळवे, मोतिराम केंद्रे आदींची उपस्थिती होती.
शहराध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे यांची निवड
उदगीर : येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . निवडीबद्दल माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, ओबीसी जिल्हा अध्यक्ष बापुराव राठोड, साईनाथ चिमेगावे, वसंत शिरसे, मनोज पुदाले, नगरसेवक ॲड. दत्ता पाटील, सभापती रामेश्वर पवार, नागेश आस्टुरे, पप्पू गायकवाड, आनंद साबणे, आनंद बुंदे, अमोल निडवडे, सागर बिरादार, विशाल रंगवाळ, आनंद भोसले, विरलाल कांबळे आदींनी कौतुक केले आहे.
क्षीरसागर, मसुरे यांची निवड
हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील संतोष क्षीरसागर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी, तर हाळी येथील रहिवासी सिद्धार्थ मसुरे यांची युवक तालुका सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहिदास कुंडगीर यांच्या हस्ते देण्यात आले. निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर आदींसह पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या रखडल्या
लातूर : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जवळपास ५५ टक्के क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. सोयाबीनसाठी ४ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, आतापर्यंत केवळ १ लाख ५० हजारांहून अधिक हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. दरम्यान, हवामान विभागाचा अंदाज फोल ठरल्याने पहिल्या पावसावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यात ६ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी अपेक्षित आहे. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
मुख्य रस्त्यावरील दुभाजकात कचरा
लातूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेणापूर नाका, बार्शी रोड, औसा रोड आदी भागातील रस्त्यावरील दुभाजकात कचरा टाकला जात आहे. नियमित कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्याने नागरिक दुभाजकात कचरा टाकत आहेत. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.