निलंगा पंचायत समिती सभापती राधाताई बिराजदार यांचे पती सुरेश बिराजदार हे दोघेही मोठ्या पदावर असतानाही त्यांनी पूर्ण लक्ष शेतीकडे दिले आहे. आपल्या शेतात त्यांनी नवनवीन प्रयोग केले आहेत. लाल आणि माळरान असणाऱ्या शेतीमध्ये विविध फळबागाच्या माध्यमातून उत्पादन घेतात. दाेन एकर शेतीमध्ये २० हजार मिरची रोपांची लागवड करण्यात आली आहे. लागवड करून साठ दिवस झाले असतानाच झाडाला मिरची आणि फुलाचे प्रमाणे मोठ्या प्रमाणात लागले आहे. मिरचीची लागवड ठिबकद्वारे करून मल्चिंग पेपरचा उपयोग केल्याने शेतात गवताचे प्रमाण अत्यल्प आहे. या दोन एकर शेतीमधून सध्या सुरू असलेल्या वीस रुपये प्रति किलो भावाने मिरची विकली तर चार ते पाच लाखाचे उत्पन्न निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्याला आहे.
चार लाखांचा हाेइल फायदा...
नियोजन आणि व्यवस्थापन चांगल्याप्रकारे हाताळणे कोणतीही शेती आपणास परवडते. कष्टाने शेती केल्यास आणि प्रयोगशील शेतीचा अवलंब केल्यास शेतकरी फायद्यात राहील, हेच या प्रयोगातून दिसून येत आहे. यापूर्वी शेतात काहीच उत्पन्न मिळत नव्हते. यावर्षी नियोजन व्यवस्थापन योग्य तरुण प्रयोगशील मिरचीची लागवड केल्याने चार लाखापर्यंतचा फायदा होईल, असे प्रयोगशील शेतकरी शिवाजी बिराजदार म्हणाले.