शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाकडे पाठपुरावा करून न्याय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या लातूर जिल्हा पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रश्नाबाबत त्यांची भेट ...

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या लातूर जिल्हा पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रश्नाबाबत त्यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या. यावेळी शिष्टमंडळाने वेतनश्रेणी, सुधारित किमान वेतनासह इतर मागण्यांचे निवेदन दिले. सध्या मिळत असलेले मानधन अनेकांना प्रतिदिवस १०० रुपयांपेक्षाही कमी आहे. त्यावर घर चालविणे कठीण झाले आहे. यासंदर्भात शासनाकडे वारंवार निवेदने दिली, तरीही तोडगा निघत नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी माजी मंत्री देशमुख म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे प्रशासकीय बैठक घेऊन आपल्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे खूप जिव्हाळ्याचे असून, सरकार कोणतेही असो सरकारने ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतन असूनसुद्धा ग्रामीण भागात २४ तास पाणीपुरवठा, दिवाबत्ती, साफसफाई व इतर सेवेच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उत्पादनाची व वसुलीची अट एकप्रकारे अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले. कमी वेतन असूनसुद्धा ग्रामपंचायत कर्मचारी काम करतात ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे, असेही देशमुख म्हणाल्याचे युनियनचे मराठवाडा अध्यक्ष दयानंद एरंडे यांनी सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे विभागीय अध्यक्ष दयानंद एरंडे, लातूर जिल्हाध्यक्ष नवनाथ नरवडे, रामेश्वर धुमाळ, निलंगा तालुकाध्यक्ष सतीश मस्के, शिरूर अनंतपाळचे तालुकाध्यक्ष ज्ञानबा कांबळे, औसा तालुकाध्यक्ष हाजोद्दीन शेख, चाकूर तालुका सचिव सलीम शेख, श्याम ठाकूर, बिडवे, परमेश्वर बनसोडे, अमोल गायकवाड, कांतराव तोरसल्ले, महेश चव्हाण, आदीजण उपस्थित होते.