शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिड प्राशन करून सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: July 5, 2016 20:08 IST

किल्लारी येथील एका सराफा दाम्पत्याने सोमवारी मध्यरात्री अ‍ॅसिड प्राशन केल्याची घटना घडली़ या दोघाही दाम्पत्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या

ऑनलाइन लोकमतकिल्लारी, दि. ५  : किल्लारी येथील एका सराफा दाम्पत्याने सोमवारी मध्यरात्री अ‍ॅसिड प्राशन केल्याची घटना घडली़ या दोघाही दाम्पत्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले़ मात्र उपचारापूर्वीच पतीचा मृत्यू झाला़ तर पत्नीची प्रकृती अत्यवस्थ असून, ती मृत्युशी झुंज देत आहे़ औसा तालुक्यातील किल्लारी येथील अजित उत्तम पोतदार (५४) यांचे किल्लारीवाडी येथे वडिलोपार्जित सोन्या-चांदीचे दुकान आहे़ सोमवारी ते दिवसभर दुकानात होते़ दिवसभर दुकानातील व्यवहार केल्यानंतर ते सायंकाळी घराकडे गेले़ सोमवारी मध्यरात्री अजित पोतदार व त्यांच्या पत्नी संजीवनी पोतदार यांनी अ‍ॅसिड प्राशन केले़ त्यांच्या खोलीतून नातेवाईकांना व्हिवळण्याचा आवाज आला़ दरम्यान, नातेवाईकांनी खोलीचे दार ठोठाऊन पाहिले़ मात्र प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे दार तोडून नातेवाईकांनी आत प्रवेश केला असता हे दोघेही जमिनीवर अत्यवस्थ स्थितीत आढळले़ त्यांच्या शेजारी अ‍ॅसिडची बॉटलही होती़ त्यामुळे नातेवाईकांनी तात्काळ या दोघांना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास लातूरच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ मात्र सराफा व्यापारी अजित पोतदार यांना तेथील डॉक्टरांनी मयत असल्याचे घोषित केले तर त्यांची पत्नी संजीवनी पोतदार यांच्यावर उपचार सुरू केले़ त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्या मृत्युशी झुंज देत आहेत़ या प्रकरणी किल्लारी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे़ पोतदार यांच्या पश्चात आई, वडील, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे़ दरम्यान, मयत अजित पोतदार यांच्या पार्थिवावर किल्लारी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले़ कर्जबाजारीपणामुळे अ‍ॅसिड प्राशऩ़़अजित पोतदार यांना चार एकर जमीन असून, त्यांच्यावर उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे ८ लाख आणि मातोळा येथील हनुमान पतसंस्थेचेही १ लाख ९ हजारांचे कर्ज आहे़ या कर्जामुळे पोतदार दाम्पत्यांनी अ‍ॅसिड प्राशन केले असावे, अशी चर्चा किल्लारीवाडीत होती़ दरम्यान, तलाठी गवळी यांनी केलेल्या पंचनाम्यातही कर्ज असल्याचा उल्लेख केला आहे़