जळकोट तालुका हा डोंगर रांगांमध्ये वसलेला आहे. तालुक्यात एकूण ४७ गावे, वाडी तांडे आहेत. एक हंगामी तालुका म्हणून याची ओळख आहे. तालुक्यातील घाेणसी परिसरातील गुत्ती, आतनूर, गव्हाण, मरसांगवी, डोंगरगाव, डोंगरकोनाळी, शिवाजीनगर तांडा, शेलदरा, उमरदरा, केकतसिंदगी, काटेवाडी, रावणकोळा, हळद वाढवणा ही गावे आणि पंधरा ते वीस तांडे डोंगरात आहेत. या परिसराच्या विकासाकडे अद्यापही दुर्लक्ष आहे. डोंगरी तालुक्याचा दर्जा मिळाला तर विकासाला गती येईल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी साकडे घातले आहे. राज्यमंत्री बनसोडे यांनी सदरच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. जळकोट तालुक्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.
जळकोटला डोंगरी तालुक्याचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:24 IST