रेल्वेची परीक्षा होणार ऑनलाईन...
रेल्वेची परीक्षा ऑनलाईन होणार आहे. मात्र, याच दिवशी एमपीएससीची परीक्षा असल्याने परीक्षा केंद्रावर पोहचणे शक्य होणार नाही. वेळापत्रक बदलामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून उमटल्या. जी परीक्षा सोयीची वाटेल तो चॉईस निवडावा लागेल. असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
केंद्रावर पोहचण्यास विद्यार्थ्यांची कसरत...
कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. सगळीकडेच रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचणे कसरतीचे आहे. परीक्षा केंद्रावर कोरोना नियमांच्या सर्व उपाययोजना असल्या तरी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरतच करावी लागणार आहे.
दोन्ही परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी म्हणाले...
रेल्वेचे वेळापत्रक फार पुर्वी जाहीर झाले होते. त्यामुळे एमपीएससीसह रेल्वेच्या परीक्षेची तयारी केली होती. मात्र, परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे अडचण आहे. त्यामुळे रेल्वेची परीक्षा टाळावी लागेल. - अमित सुर्यवंशी, विद्यार्थी
एमपीएससीच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या. नवीन तारीख जाहीर करताना रेल्वेच्या परीक्षेच्या तारखेचा विचार करायला हवा होता. मात्र, तसे न झाल्यामुळे मला रेल्वेची परीक्षा सोडून द्यावी लागणार आहे. - राजेश मस्के, विद्यार्थी
एमपीएससी बरोबरच रेल्वेच्या परीक्षेची मी तयारी करतोय. परंतू, दोन्ही परीक्षेचे वेळापत्रक एकाची दिवशी आहे. त्यामुळे मी एमपीएससी ऐवजी रेल्वेची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. - गौतम साबळे, विद्यार्थी