शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रोटरीच्या वतीने गौरी-गणपती सजावट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST

उदगीर : येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे ...

उदगीर : येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे महिला सशक्तिकरण, पर्यावरण व लढा कोरोनाशी आदी विषय ठेवण्यात आले आहेत. या विषयाला अनुसरून स्पर्धकांनी आपल्या गौरी- गणपतीच्या समोर केलेल्या देखाव्याचा तीन मिनिटांचा व्हिडीओ रोटरी क्लबकडे सादर करावा. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपले व्हिडीओ प्रोजेक्ट चेअरमन डॉ.सुनिता लोहारे व महानंदा सोनटक्के यांच्याकडे पाठवावेत, असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष प्रमोद शेटकार व सचिव रवींद्र हसरगुंडे यांनी केले आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विजेत्यांना अनुक्रमे १,००१ रु., ५०१ रु. व २५१ रु. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

श्री हावगीस्वामी महाविद्यालयात शिक्षक दिन.

उदगीर : येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिन शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रा.प्राचार्य डॉ.संजय शिंदे यांनी राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा.डॉ.दत्ताहरी होनराव, उपप्राचार्य प्रा.डॉ.आप्पाराव काळगापुरे, कार्यालयीन अधीक्षक सूर्यकांत धनुरे, ग्रंथपाल प्रा.अजित रंगदळ, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.दिलीपकुमार मुंदडा, महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.मनोहर भालके यांनी तर आभार प्रा.सुरेश हुसे यांनी मानले.

डी.टी. गाथाडे यांचे निधन

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील हिप्पळगाव येथील दगडू तुकाराम उर्फ डी.टी.गाथाडे (५८) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

जिल्हाध्यक्षपदी कीर्तीरतन सोनाळे यांची निवड

भालकी : वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी भालकी येथील कीर्ती रतन सोनाळे यांची तर सचिवपदी रवींद्र देवगफडे, कोषाध्यक्षपदी राजू शिंदे यांची निवड करण्यात आली. कर्नाटक प्रभारी नागेश माने यांच्या नेतृत्वात निवडी करण्यात आल्या. यावेळी कालिदास सूर्यवंशी, राहुल शिंदे, अशोक साने, संतोश गायकवाड, नागनाथ बिरादार, रफिक गोरवाले, प्रदीप भाविकट्टी, किरण कांबळे, मिलिंद मुळे, अशोक शिंदे, भरत लंजवाडे, दत्ता बुडक्के, विनोद लाखणगाव, विजित कांबळे, उदय वाघमारे उपस्थित होते.