शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! उदगीरात गणरायाला सातव्या दिवशी निरोप

By संदीप शिंदे | Updated: September 6, 2022 17:16 IST

गणेश मंडळाच्यावतीने भव्य मिरवणुक काढून विसर्जन

उदगीर (जि. लातूर) : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात तसेच ढोल ताशाच्या गजरात, गुलाल, फुलांची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीने उदगीर शहरातील गणरायाला मंगळवारी निरोप देण्यात आला. शहरात गणेश मंडळाच्यावतीने भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध होते. मात्र, यंदा निर्बंधमुक्त उत्सव असल्याने गणेश मंडळाच्यावतीने विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. उदगीरच्या परंपरेनुसार सातव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात येतो. मंगळवारी सकाळपासूनच श्रीगणरायाला निरोप देण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. सकाळी ११.३० वाजता मानाच्या पारकट्टी गल्लीतील आजोबा गणपतीच्या मूर्ती पूजन करून आरती करण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन, सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक गोरख दिवे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, प्रा. मल्लेश झंगा स्वामी, राजकुमार हुडगे, अमोल निडवदे, उत्तराताई कलबुर्गे आदींसह भाविकांची उपस्थिती होती.आजोबा गणपतीची पूजा झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोलताशांचा गजर करीत पारंपरिक हलगीचा ठेका, संबळ वाद्याच्या आवाजावर गुलालाची उधळण बाप्पांच्या जयघोषाने अवघे उदगीर शहर दुमदुमून गेले होते. मिरवणुकीत हातात भगवे ध्वज घेऊन गणेश मंडळाचे भक्त मंडळापुढे लयबद्ध पद्धतीने नृत्य करताना दिसत होते.

मिरवणुका पाहण्यासाठी भाविकांची गर्दी...उदगीर शहरात परंपरेनुसार सातव्या दिवशी मंगळवारी निरोप देण्यात आला. मिरवणुकीदरम्यान, गणेश मंडळाचे पदाधिकारी विविध रंगाचा पेहराव, फेटे घालून सहभागी झाले होते. गणेश मंडळाच्या मिरवणुका पाहण्यासाठी भाविकांनी शहरातील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. दरम्यान, भाविकांनी उत्साहपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवlaturलातूर