शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

२२ हजारांवर नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 05:28 IST

माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पाचव्या स्मृतिदिनी बाभळगाव (जि. लातूर) येथील विलासबागेत मराठवाड्यासह राज्यातील चाहत्यांनी आपल्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली.

लातूर : माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पाचव्या स्मृतिदिनी बाभळगाव (जि. लातूर) येथील विलासबागेत मराठवाड्यासह राज्यातील चाहत्यांनी आपल्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली. जिल्ह्यात सोमवारी दिवसभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. दीडशे रुग्णालयांमध्ये २२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.विलासबाग येथे सोमवारी सकाळी ९ वाजता सामुदायिक प्रार्थना सभा झाली. माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, सुवर्णाताई देशमुख, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख, आदिती देशमुख, धीरज देशमुख, अवीर व अवन देशमुख, अभिजित देशमुख, सत्यजीत देशमुख, जयसिंगराव देशमुख यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. या वेळी लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितहोते.दिवसभर शहरातील दीडशे रुग्णालयांमध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच ज्यांना शस्त्रक्रिया व पुढील उपचार घ्यायचे आहेत, त्यांनाही सवलत दिली जाणार असल्याचे समन्वयक डॉ. कल्याण बरमदे यांनी सांगितले.