शहरातील रेणुकादेवी मंदिर सभागृहात आयोजित शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते नागनाथ दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष मतीनअली सय्यद, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब करमुडे, रेणा कारखान्याच्या संचालिका वैशाली पंडित माने, बाजार समितीचे माजी संचालक जनार्दन माने, कमलाकर आकनगिरे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पूजा विशाल इगे, निर्मला गायकवाड, नगरपंचायतीतील काँग्रेसचे गटनेते पद्म पाटील, नगरसेवक रामलिंग जोगदंड, भूषण पनुरे, अनिल पवार, रजियाबी शेख, शिवाजी गाडे, सचिन इगे, प्रदीप काळे, शिवाजी रणदिवे, रेणुका देवी ट्रस्टचे राम पाटील, उटगे गुरुजी आदी उपस्थित होते. शिबिरात १५० गरजू रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील २६ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
रेणापूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST