शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विठूरायाच्या वारीसाठी चार विशेष रेल्वेगाड्या

By admin | Updated: November 9, 2016 01:00 IST

उदगीर कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या विठूभक्तांच्या मांदियाळीसाठी रेल्वेने विशेष गाड्यांची सोय केली आहे़

चेतन धनुरे / श्रीपाद सिमंतकर  उदगीरकार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या विठूभक्तांच्या मांदियाळीसाठी रेल्वेने विशेष गाड्यांची सोय केली आहे़ भाविकांची संख्या लक्षात घेऊन लातूर, नांदेड, बीदर येथून ४ विशेष रेल्वेंची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे़ परंतु, मध्य रेल्वेच्या गलथान कारभाराने लातूरहून मंगळवारी सकाळी सुटलेल्या पहिल्या रेल्वेची माहितीच उशिरा देण्यात आली़ त्यामुळे या रेल्वेतून केवळ ८ प्रवाशांनी प्रवास केला. कार्तिकी एकादशीला पंढरपुरी रंगणाऱ्या सोहळ्यासाठी हजारो भाविक जातात़ विशेषत: लातूर, नांदेड, बीदर, उस्मानाबाद जिल्ह्यातील भाविकांची संख्या मोठी असते़ ही बाब लक्षात घेऊन लातूरचे खासदार डॉ़सुनील गायकवाड, बीदरचे खासदार भगवंत खुब्बा, उदगीर व लातूर येथील रेल्वे संघर्ष समित्यांनी रेल्वे बोर्डाकडे विशेष गाड्यांसाठी मोठा पाठपुरावा केला़ त्याअनुषंगाने दक्षिण मध्य रेल्वे व मध्य रेल्वेने या भागांसाठी चार विशेष रेल्वेची सोय करुन दिली़ त्यात नांदेड-पंढरपूर, अदिलाबाद पंढरपूर, लातूर-पंढरपूर व बीदर पंढरपूर या गाड्यांचा समावेश आहे़ यातील पहिली गाडी मंगळवारी सकाळी लातूरहून सकाळी ६.४५ वाजता पंढरपूरकडे रवाना झाली़ यानंतर नांदेड व अदिलाबाद येथून सुटणाऱ्या गाड्याही परळी, लातूर मार्गे पंढरपूरकडे रवाना होणार आहेत़ बीदरहून सुटणारी विशेष रेल्वे १० नोव्हेंबरला रात्री ०९़०५ वाजता सुटेल़ ती भालकी, उदगीर, लातूररोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी व कुर्डूवाडी येथे थांबा घेऊन ११ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता पंढपुरात दाखल होईल़ परतीची रेल्वे ११ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता पंढरपूर स्थानकातून बीदरसाठी रवाना होईल़ ती याच मार्गे पहाटे ४ वाजता बीदरला पोहोचेल़ तसेच अदिलाबाद-पंढरपूर ही गाडी १० नोव्हेंबरला दुपारी २ वाजता अदिलाबाद येथून निघून किनवट, हिमायतनगर, भोकर, मुखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, परळी, लातूरमार्गे ११ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता पंढरपूर पोहोचेल़ परतीची ही रेल्वे १६ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता पंढपुरातून निघून त्याच मार्गे रात्री १२़३० वाजता अदिलाबादला पोहोचेल़ पंढरपूर-नांदेड रेल्वे ११ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता पंढरपुरातून निघून लातूरमार्गे ती रात्री ८़४५ वाजता नांदेडला पोहोचणार आहे़ तसेच १५ नोव्हेंबरला ही रेल्वे नांदेड येथून सायंकाळी ७़२५ वाजता नांदेड येथून निघून ती दुसऱ्या दिवशी सकाळी ७़३० वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे़ ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत लातूरहून दररोज पंढरपूरसाठी रेल्वेसेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे़ ही रेल्वे लातूरहून रोज सकाळी ७़४५ वाजता निघून पंढरपूरला दुपारी १२़४५ वाजता पोहोचेल़ परतीची रेल्वे त्याच दिवशी रोज दुपारी २ वाजता निघून लातूरला सायंकाळी ७ वाजता पोहोचेल़ या रेल्वेसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार सुनिल गायकवाड यांनी केले आहे.