शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील साडेचार हजार शेतरस्ते झाले अतिक्रमणमुक्त !

By संदीप शिंदे | Updated: May 4, 2023 14:23 IST

महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ५८५ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत.

लातूर : शेतात जाण्यासाठी रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यात पुर्वीच्या असलेल्या रस्त्यावरही अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले होते. परिणामी, शेतरस्त्यामुळे शेतमाल घरी नेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ५८५ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये गाव नकाशावरील नोंद असलेल्या ४ हजार ९८० शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. महाराजस्व अभियानातंर्गत ३० एप्रिलपर्यंत त्यापैकी ४ हजार ५८५ रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. गाव नकाशावर नोंद नसलेल्या १ हजार ९३ शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. ३० एप्रिलपर्यंत यापैकी ९७१ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. उर्वरित रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरु असून त्यांनाही गती देण्यात आली आहे. 

अनेकदा शेतातील रस्त्यावरुन भावकीमध्ये वाद होतात. ही प्रकरणे तहसील तसेच न्यायालयापर्यंत जातात. तोपर्यंत शेतकऱ्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागतो. मात्र, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी १ मे पर्यंत जिल्ह्यातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जवळपास ४ हजार ५८५ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मदत होणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित अतिक्रमणमुक्त शेतरस्ते लवकरात लवकर मोकळे करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

नोंद नसलेले रस्तेही अतिक्रमणमुक्त...जिल्ह्यात गाव नकाशावर नोंद नसलेल्या १ हजार ९३ शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. ३० एप्रिलपर्यंत यापैकी ९७१ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. महसूल विभागाकडून गावा-गावातील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या अतिक्रमणमुक्त रस्त्यांवर शेतकरी मुरुम टाकून मजबुतीकरण करीत आहे. परिणामी, पावसाळ्यातही शेतापर्यंत जाण्यासाठी सोय होणार आहे.

महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी...महाराजस्व अभियानांतर्गत शेतरस्ते, अतिक्रमणमुक्त रस्ते मोकळे करण्यासाठी योजना राबविली जात आहे. अनेक शेतकरी शेतरस्त्याचे प्रश्न घेऊन तहसील, जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करीत होते. मात्र, या अभियानाला प्रत्यक्ष गती मिळाल्याने बहूतांश रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :laturलातूरroad safetyरस्ते सुरक्षाgram panchayatग्राम पंचायत