रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी ८७ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. २० रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहेत. तर, २५ रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर असून, १९१ रुग्ण मध्यम परंतु ऑक्सिजनवर आहेत. ३०९ रुग्ण मध्यम परंतु, विनाऑक्सिजनवर आहेत. सौम्य लक्षणाचे ४७३९ रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्हिटी वाढली असून, प्रयोगशाळेतील चाचणीची पॉझिटिव्हिटी रेट २९.२ टक्के, तर रॅपिड ॲण्टिजेन टेस्टची पॉझिटिव्हिटी १८.६ टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख १० लाख २४३ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या असून, या चाचण्यांतून ३४ हजार २२१ बाधित आढळले आहेत.
४१८ रुग्णांना शुक्रवारी मिळाली सुटी
प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर ४१८ जणांना शुक्रवारी सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील ३७५ जणांचा समावेश असून, एक हजार मुलामुलींच्या वसतिगृहातील २३, समाजकल्याण हॉस्टेल, कव्हा रोड कोविड केअर सेंटर १०, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १, तोंडार पाटी कोविड केअर सेंटर येथील ५ आणि खाजगी रुग्णालयातील ४ अशा एकूण ४१८ जणांनी कोरोनावर मात केली.
रिकव्हरी रेट ८२.३४ टक्के
३४ हजार २२१ पैकी २८ हजार १७८ रुग्ण बरे झाले असून, बरे होण्याचे प्रमाण ८२.३४ टक्के आहे. रुग्ण दुप्पट दिवसांचा कालावधी २५४ दिवसांवर असून, मृत्यूचे प्रमाण २.३ टक्के आहे. मार्च महिन्यात ८०५६ रुग्ण आढळले होते. तर, या महिन्यात एकूण ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. १ मार्चपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा.