शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अग्नी प्रतिबंधक नळकांड्या गायब !

By admin | Updated: November 10, 2014 01:17 IST

लातूर : अचानक लागलेली आग विझविण्यासाठी अग्नी प्रतिबंधक नळकांड्या बसेसमध्ये असण्याचा नियम आहे़ परंतु एसटी महामंडळाच्या अनेक बसेसमध्ये आग आटोक्यात आणण्याचे

लातूर : अचानक लागलेली आग विझविण्यासाठी अग्नी प्रतिबंधक नळकांड्या बसेसमध्ये असण्याचा नियम आहे़ परंतु एसटी महामंडळाच्या अनेक बसेसमध्ये आग आटोक्यात आणण्याचे कोणतेही साहित्य नसल्याचे समोर आले आहे़ ‘लोकमत’ चमूने रविवारी दुपारी १२ ते १़३० वाजेपर्यंत लातूर बसस्थानकात लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यात धावणाऱ्या अनेक बसेसमध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांड्या आहेत का? याचे स्टिंग आॅपरेशन केले़ दीड तासात लातूर बसस्थानकात पाहिलेल्या १५ गाड्यांपैकी केवळ एका बसमध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांडी होती़ त्याचीही कालमर्यादा संपलेलीच़दोन दिवसांपूर्वी देगलूर आगाराच्या धावत्या बसला अचानक आग लागली होती़ या घटनेचा बोध घेऊन, बसेसमधील अग्नी प्रतिबंधक नळकांड्या व अन्य साहित्य ठेवले जाईल अशी अपेक्षा होती़ परंतु बहुतांश गाड्यामध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांड्या नसल्याचे निदर्शनास आले आहे़ शोभेची वस्तू म्हणून तरी महामंडळाने अग्नी प्रतिबंधक उपाययोजना नळकांड्या ठेवल्या नाहीत़निजामाबाद-मंगळवेढा, उदगीर-सोलापूर, अहमदपूर-सोलापूर, लातूर-पोहरेगाव, लातूर-पानगाव, लातूर-नांदेड, नांदेड-भोकर, लातूर-औसा, औसा-लातूर, निलंगा-गुलबर्गा, भोकर-अक्कलकोट, उदगीर-पुणे, लातूर-उदगीर या बसेसमध्ये आग आटोक्यात आणण्याच्या प्रतिबंधक नळकांड्या नावालाही नव्हते़ चालकाच्या पाठीमागे अथवा बसच्या आतील मागच्या बाजूस आग प्रतिबंधक नळकांड्या बसविण्याचा नियम आहे़ परंतु या १४ बसेसमध्ये आग प्रतिबंधक नळकांड्या नसल्याचे स्टिंग आॅपरेशन नंतर समोर आले आहे़ जालना-गुलबर्गा या बसमध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांडी होती़ परंतु त्याची कालमर्यादा संपलेली होती़ तीन प्रकारचे अग्नी प्रतिबंधक नळकांड्या असतात़ एक पाण्याने भरलेली, दुसरी केमिकलयुक्त पावडरने भरलेली तर तिसरी गॅसने भरलेली असते़ यापैकी कोणतीही एक अग्नी प्रतिबंधक नळकांडी असावी, असा नियम आहे़ परंतु या नियमाचे महामंडळाच्या बसेसमधून उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे़ प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खाजगी प्रवासी बसेसना अग्नी प्रतिबंधक नळकांड्याची सक्ती केली आहे़ ज्या खाजगी बसेसमध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांड्या नाहीत, अशा बसेसची प्रवाशी वाहतुकीची नोंदणी रद्द करण्यात येते़ काल-परवाच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहतूक नियमांचे आणि बसेसच्या रचनेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे १५ बसेस जप्त केल्या आहेत़ इकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने मात्र देगलूर घटनेचाही बोध घेतला नाही़ प्राथमिक आग आटोक्यात आणण्यासाठी या नळकांड्या यशस्वी ठरू शकतात़ आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर या नळकांड्यांच्या द्वारे आग विझविता येवू शकते़ परंतु महामंडळाच्या बसेसमधूनच या नळकांड्या गायब झाल्या आहेत़