शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

शेतकऱ्यांना कर्ज न देणा-या बँकांवर गुन्हे दाखल करू- सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 05:18 IST

ज्या राष्ट्रीयकृत बँका शेतक-यांना कर्जपुरवठा करणार नाहीत, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करू, असा इशारा अर्थ व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिला.

लातूर : ज्या राष्ट्रीयकृत बँका शेतक-यांना कर्जपुरवठा करणार नाहीत, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करू, असा इशारा अर्थ व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिला. शेतक-यांना पतपुरवठा करताना काही राजकीय भावना ठेवली आहे का, हे तपासण्याची आवश्यकता आहे़ सहकार विभाग कृषी पतपुरवठ्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत आहे़ राष्ट्रीयकृत बँकांतून पतपुरवठा चांगला व्हावा, यासाठी लक्ष दिले जात आहे़ जर पतपुरवठा होत नसेल तर राष्ट्रीयकृत बँकांवर गुन्हा दाखल करू असे सांगत मुनगंटीवार म्हणाले, राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड मोहीम सुरु आहे़ परंतु, ही वृक्ष लागवड २८ विभागाअंतर्गत आणि सामाजिक संस्थामार्फत होत आहे़ वृक्ष विकत घेऊन ही लागवड करावी़ ही लोकचळवळ व्हावी, असेही मुनगंटीवार म्हणाले.राज्यात साडेबारा कोटी मोबाईल, साडेसात कोटी स्मार्टफोन आहेत़ दोन तास व्हॉटस्अ‍ॅपवर खर्च करता त्यासाठी वार्षिक ४३ हजार ८०० कोटी रुपये खर्च होतात़ मग प्राणवायू आणि आयुष्यासाठी ४२ कोटींची झाडे का नकोत, असा सवाल करीत एखादे वृक्ष लावा आणि त्याचे संवर्धन करायची जबाबदारी घ्या, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत़ त्यांची नाराजी ही जनतेच्या प्रश्नांसंदर्भात असू शकते़ ते स्वत:साठी माझ्यावर अन्याय झालाय असे कधीच म्हणत नाहीत़ तसेच छगन भुजबळ यांचा सर्वच राजकीय पक्षांशी संबंध आहे़राजकारणात शत्रुत्व नसते, एकमेकांशी भेटणे यावरून पक्ष बदलाचा अर्थ नको, असे एका प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले.

मराठवाड्याला न्याय मिळाला तरच विदर्भ खूशमराठवाडा माझी सासरवाडी आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून मराठवाड्याला जितका न्याय देता येईल, तितका न्याय देण्याचा सदैव प्रयत्न राहतो. किंबहुना मराठवाड्याला न्याय मिळाला तरच विदर्भ खूश राहतो,अशी पुस्तीही त्यांनी जोडली.