शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके; मराठी-उर्दू माध्यमांचा समावेश

By संदीप शिंदे | Updated: June 7, 2024 18:30 IST

शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर पुस्तके वाटप

संदीप शिंदे, लातूर: समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. येत्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके दिली जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील १० पंचायत समिती स्तरावरून मिळालेल्या मागणीनुसार प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाकडे मागणी नोंदवली होती. आता पुस्तके तालुकास्तरावर दाखल झाली असून, शाळांकडे पोहोच केली जात आहेत.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद, शासकीय व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची २ लाख ६७ हजार ७७२ असून, त्यांच्यासाठी तेवढ्या पाठ्यपुस्तक संचाची मागणी नोंदवण्यात आली होती. २०२४ - २५ या शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे. ही पुस्तके एकात्मिक स्वरुपाची असून, मराठी, उर्दू माध्यमांचा यात समावेश आहे. पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्यानंतर तालुकास्तरावर पोहोचवली आहेत. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, शाळेतील गळतीचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांत त्याचा सकारात्मक बदल दिसून येईल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. महिनाभरापूर्वी बालभारतीकडून पुस्तके दहाही तालुक्यातील पंचायत समित्यांकडे रवाना करण्यात आली होती. ही पुस्तके पंचायत समितीमधून शाळांमध्ये पोहोच करण्यात येत आहेत. शनिवार, १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असून, पहिल्याच दिवशी पुस्तके दिली जाणार आहेत.

मराठी माध्यमाचे २ लाख ४३ हजार विद्यार्थी

पहिलीसाठी मराठी माध्यमाचे २७,८१४, दुसरीचे २७,८१४, तिसरी २७,४३९, चौथी ३१,०६१, पाचवी २७,५८२, सहावी ३१,८९६, सातवी ३४,२६६, तर आठवीच्या ३५ हजार २७१ अशा एकूण २ लाख ४३ हजार १४३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्हा परिषद, खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या वतीने पुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.

उर्दू माध्यमाचे २४ हजार ६२९ विद्यार्थी

पहिलीसाठी उर्दू माध्यमाचे ३,२६२, दुसरीचे ३,२६२, तिसरी ३,१५९, चौथी ३,१६९, पाचवी २,८८५, सहावी ३,०७१, सातवी २,८९६, तर आठवीच्या २ हजार ९२५ अशा एकूण २४ हजार ३१२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या १,२७१, उर्दू माध्यमाच्या १५१, हिंदी माध्यमाच्या दोन, इंग्लिश माध्यमाच्या २२८, अशा एकूण २,६५६ शाळा आहेत. यातील मराठी आणि उर्दू शाळेत या पुस्तकांचे वाटप होणार आहे.

शिक्षण विभागाकडून वितरणाचे नियोजन पूर्ण

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सीईओ अनमोल सागर, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. पंचायत समितीस्तरावर पुस्तके दाखल झाली असून, आता शाळांकडे पोहोच करण्यात येत आहेत. शनिवार, १५ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. नियोजन पूर्ण झाल्याचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी सांगितले.

मराठी, उर्दु माध्यमाचे तालुकानिहाय पुस्तके वितरण

  • अहमदपूर - २८७६२
  • औसा - २८६१५
  • लातूर - ८३४९७
  • निलंगा - ३२३०२
  • उदगीर - ४०७१९
  • चाकूर - १६०४१
  • रेणापूर - ११५७०
  • देवणी - ८२९९
  • जळकोट - ८९६०
  • शिरुर अनं. - ७००४
  • -------------------
  • एकूण - २६७७७२
टॅग्स :laturलातूर