शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

राज्यातील खतांच्या कारखान्यांना नवसंजीवनी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST

अहमदपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पणन महासंघाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आ. बाबासाहेब पाटील यांचा सत्कार साेहळा आयाेजि ...

अहमदपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पणन महासंघाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आ. बाबासाहेब पाटील यांचा सत्कार साेहळा आयाेजि करण्यात आला हाेता. यावेळी ते बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती शिवानंद हेंगणे, नायब तहसीलदार मोरे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सिराजुद्दीन जाहागीरदार, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजहर भाई बागवान, दिलीप जाधव, विकास महाजन, चंद्रकांत मद्दे, तुकाराम पाटील, शिवाजीराव खांडेकर, निवृत्तीराव कांबळे, प्रशांत भोसले, अ‍ॅड भारतभूषण क्षिरसागर, बाळासाहेब पाटील आंबेगावकर, अ‍ॅड. सांब शेटकर, अनिल मेंनकुडळे, सुभाष मुढे, श्याम देवकट्टे, दयनोबा देवकत्ते, गाेपीनाथ जोंधळे, दयानंद पाटील, अभय मिरकले, सतीश नवटक्के, आशिष तोगरे, अजहर सय्यद, फिरोज शेख, अतिश खुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य दरात खत पुरवठा करण्यासाठी कारखाने उभारण्यात आले होते. मात्र, या कारखान्याला घरघर लागली आहे. त्यांना नवसंजिवनी देऊन शेतकऱ्यांना भगीरथ, युरिया या खताचा शासन दराप्रमाणे पुरवठा करणार आहाेत. अहमदपूर तालुक्यात शेती सिंचन क्षेत्रखाली आणण्यासाठी ११ कोटींची बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक, धवल आणि हरितक्रांती होणार आहे. रस्ते, वीज, पाणी, मार्केटिंगची व्यवस्था करून जिल्ह्यात टाेमॅटाेचा व्यापार खूप मोठा आहे. आपले टाेमॅटाे रेल्वेने दिल्लीत पोहोचविण्यासाठी व्यवस्था करायची आहे. दूध प्रकल्पामधून दूध, दही, तूप, बटरची विक्री वाढली की शेतकऱ्याच्या दूध व्यवसायाला चांगले दिवस येतील.

शिवभोजन याेजना महत्वाची...

अहमदपूर येथे सुरु करण्यात आलेली पाच रुपयांत शिवभाेजन थाळी याेजना महाविकास आघाडीची महत्वाची आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे म्हणाले, आ. बाबासाहेब पाटील हातात माती घेतली तरी त्याचं सोनं करतात. ते ज्या-ज्या क्षेत्रात गेले त्या-त्या ठिकाणी योजनेला लागलेली घरघर त्यांनी संपुष्टात आणली आहे. त्या व्यवस्थेलाही पुनर्जीवित केले आहे. प्रारंभी शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन झाले. प्रारंभी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या वतीने आ. बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आडत व्यापारी, हमाल संघटना, महिला संघटनांच्या वतीनेही आमदार पाटील यांचा सत्कार झाला.