शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

विदेशातील गणेशोत्सवात ऑनलाईन कार्यक्रमाची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उदगीर : नोकरी, व्यवसाय व शिक्षणानिमित्त वेगवेगळ्या देशांमध्ये वास्तव्याला असणारी भारतीय मंडळी दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उदगीर : नोकरी, व्यवसाय व शिक्षणानिमित्त वेगवेगळ्या देशांमध्ये वास्तव्याला असणारी भारतीय मंडळी दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात. जगभरात कार्यरत असणारी मराठी मंडळेही गणेशोत्सवाची परंपरा चालवत आहेत. त्यात तैवान येथील मराठी मंडळही कोरोनामुळे निर्बंध लागू असतानाही गणेशोत्सवाच्या परंपरेत खंड नको म्हणून यंदा ऑनलाईन गणेशोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे देशाप्रमाणे विदेशातही ऑनलाईन गणेशोत्सवाची मेजवानी भाविकांना मिळत आहे.

तैवान येथे सन २०१५पासून मराठी मंडळ कार्यरत आहे. पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, नांदेड, लातूर, उदगीर येथील १००पेक्षा अधिक तरूण-तरूणी शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त तैवानमधील विविध शहरांत वास्तव्याला आहेत. गणेशोत्सवानिमित्त हे सर्वजण दरवर्षीच एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. मात्र, यंदा कोरोना आणि निर्बंधांमुळे प्रत्यक्ष गणेशोत्सव साजरा करणे या मंडळाला शक्य झाले नाही. त्यामुळे या मंडळाने ऑनलाईन गणेशोत्सव सुरू केला आहे. प्रत्यक्ष भेटता आले नसले, तरी या मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य ऑनलाईनद्वारे दररोज भेटतात, उत्सवासंदर्भात चर्चा करतात. तैवानमधील उदगीर येथील पंडित आंब्रे, बालाजी बर्वे, संदीप वाघ, संजय मदने, रोहन पाष्टे, पूनम बोराडे, शुभम नवले, अतुल लांजेवार, धैर्यशील चेंडके, स्वप्नील गुजराती, सयाजी मोरे, रेवण कट्टे, कृष्णा बोराडे, बालाजी काळे, रामेश्वर स्वामी, वरद मोडक, महेश गाडेकर आदींनी या ऑनलाईन गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे.

निर्बंधांमुळे ऑनलाईन गणेशोत्सव...

कोरोना संसर्गाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. भारताप्रमाणेच तैवान येथेही निर्बंध कायम आहेत. त्यामुळेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेत यंदाचा गणेशोत्सव ऑनलाईन घेण्याचा निर्णय तैवान येथील मराठी मंडळाने घेतला. त्यानुसार ऑनलाईन उत्सवाला सुरूवात झाली आहे. या उत्सवात विशेष ऑनलाईन व्याख्याने पार पडत आहेत. त्यात ग्रामीण कवी प्रा. इंद्रजित भालेराव, प्रा. राजेश पाटील यांचे व्याख्यान व कविता वाचनाचा कार्यक्रम पार पडला.

संकटकाळी राज्याला मदतीचा हात...

देशापासून दूर असले, तरी सामाजिक बांधिलकी जाेपासण्यात तैवान येथील मराठी मंडळ आघाडीवर आहे. महाराष्ट्रात ज्या-ज्या वेळी संकटे कोसळली, त्यावेळी मदत करून खारीचा वाटा उचलण्याचे काम या मंडळाने केले आहे. सन २०१९ व २०२१मध्ये पूरग्रस्तांना मराठी मंडळाने आर्थिक मदत केली आहे. या मंडळातील सर्व सदस्य महाराष्ट्रीयन असल्याने त्यांना कायम मातृभूमीची ओढ असल्याचे या मंडळाचे सदस्य व उदगीर तालुक्यातील घोनसी येथील रहिवासी पंडित आंब्रे यांनी सांगितले.