यासंदर्भात शेतकऱ्यांनी पत्रपरिषदेत सांगितले, राष्ट्रीय महामार्गासाठी अहमदपूर शहरानजीक राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. या शेतकऱ्यांना मावेजापोटी उपजिल्हाधिकाऱ्यांनी खरेदीखताआधारे सरासरी २९०२ रुपये प्रतिचौरस मीटर असा दर निश्चित करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी लवादाकडे अपिल करून ६७९ रुपये प्रतिचौरस मीटरप्रमाणे दर निश्चित झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. दरातील तफावतीमुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. संपादित जमिनी या प्लॉटिंग व शहराजवळ आहेत. त्यामुळे देण्यात येणारा दर हा खूप कमी आहे. त्याचा फेरविचार न झाल्यास महामार्गाचे काम होऊ देणार नाही, असा पवित्राही शेतकऱ्यांनी घेतला आहे.
यावेळी प्रा. गोविंद शेळके, शामराव भगत, बालाजी बोबडे, नंदकुमार भगनुरे आदींची उपस्थिती होती. उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर प्रा. गोविंद शेळके, शामराव भगत, बालाजी बोबडे, नंदकुमार भगनुरे, नामदेव सातापुरे, दिनेश भगत, बाबुराव बिलापट्टे, माऊली बिलापट्टे, अनिल फुलारी, सादिक शेख, मुस्ताक बक्षी, सुभाष चेवले, लक्ष्मण चेवले, कैलास भगत, बाबुराव भगत, धर्मराज चावरे, मगदुम पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.