शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

साेयाबीनचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांना काेट्यवधींचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST

लातूर येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनला गत महिनाभरात तब्बल दहा हजारांवर भाव मिळाला हाेता. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी ...

लातूर येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनला गत महिनाभरात तब्बल दहा हजारांवर भाव मिळाला हाेता. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव साेयाबीनला मिळाला आहे; मात्र आवक अत्यल्प हाेती. अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळावा यासाठी घरातच ठेवलेले साेयाबीन या काळात विक्रीसाठी बाजार समिती, अडत बाजारात आणले हाेते. ज्यांनी भाव पाहून साेयाबीन बाजारात विक्रीसाठी आणले, त्यांच्या साेयाबीनला दुप्पट भाव मिळाला आहे; मात्र असे शेतकरी फार कमी आहेत. सध्याला यंदाच्या हंगामातील नवीन साेयाबीनची साेमवार, मंगळवारी माेठ्या प्रमाणावर आवक झाली अन् भाव चक्क गडगडत ६ हजारांवर आले. यातून प्रतिक्विंटल तब्बल तीन हजारांची घसरण झाली आहे. १६ सप्टेंबर राेजी लातुराच्या बाजारात साेयाबीनची १ हजार २९७ क्विंटल आवक झाली. याला कमाल भाव ९ हजार १००, किमान भाव ८ हजार ७०० आणि सर्वसाधारण भाव ८ हजार ९१० रुपयांचा मिळाला आहे. १८ सप्टेंबर राेजी लातूरच्या बाजारात १ हजार २८९ क्विंटल साेयाबीनची आवक झाली. याला कमाल भाव ८ हजार ९९१ रुपयांचा मिळाला. किमान भाव ६ हजार २०१ रुपये, तर सर्वसाधारण भाव ८ हजार ७८० रुपयांचा मिळाला आहे. त्यापाठाेपाठ साेमवार, २० सप्टेंबर राेजी लातूरच्या बाजारात २ हजार ८५७ क्विंटल साेयाबीनची आवक झाली. प्रति क्विंटलला कमाल भाव ६ हजार २९१ रुपये मिळाला, तर किमान भाव ५ हजार ५० रुपये आणि सर्वसाधारण भाव ६ हजार १५० रुपयांचा मिळाला आहे. मंगळवारी लातूरच्या बाजारात ५ हजार २२६ क्विंटलची आवक झाली असून, भाव मात्र गडगडले. साेयाबीनला कमाल भाव ६ हजार ३०० रुपयांचा मिळाला. किमान भाव ४ हजार ६०१ रुपये आणि सर्वसाधारण भाव हा ६ हजार १५० रुपयांचा मिळाला आहे. परिणामी, प्रतिक्विंटल जवळपास ३ हजारांचा फरक पडला आहे. बुधवारी लातुरात ९ हजार ८५ क्विंटलची आवक झाली आहे.

जुलैमध्ये मिळाला रेकाॅर्डब्रेक भाव...

लातूर आणि उदगीर येथील बाजार समितीत जुलै महिन्यात साेयाबीनचे भाव १० हजारांपेक्षा अधिक हाेते. आजपर्यंतचा हा भाव रेकाॅर्डब्रेक हाेता. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण हाेते. मात्र, सप्टेंबरअखेर शेतकऱ्यांच्या साेयाबीनची माेठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आणि भाव गडगडले. साेमवार, मंगळवारी तर चक्क ३ हजारांच्या घरात घसरण झाली. १८ सप्टेंबरला ६ हजार २०० रुपयांचा भाव असला तरी, पाेटलीतला भाव हा ५ हजार ५०० रुपयांच्या घरातच हाेता. ज्यावेळी ओलावा आणि माती असल्याचे कारण सांगितले जाते, त्यावेळी शेतकऱ्यांना आहे त्या भावापेक्षा कमी भावात शेतीमाल विकावा लागताे.