शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

साकोळ प्रकल्प भरल्याने शेतक-यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील विविध गावांच्या ओसाड जमिनीवर नंदनवन फुलविण्यासाठी साकोळ मध्यम प्रकल्प वरदान ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे ...

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील विविध गावांच्या ओसाड जमिनीवर नंदनवन फुलविण्यासाठी साकोळ मध्यम प्रकल्प वरदान ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे मध्यम प्रकल्प शंभर टक्के कधी भरणार याकडे लागले होते. दरम्यान, संततधार झालेल्या पावसामुळे साकोळ मध्यम प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी ओव्हर फ्लो झाला असून, शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे परिसरातील विविध गावांतील शेतक-यांनी जल्लोषात प्रकल्पातील जलसाठ्याचे पूजन केले.

तालुक्यातील साकोळ मध्यम प्रकल्पामुळे उदगीर, देवणी, शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यातील दैठणा, शेंद, तिपराळ, कानेगाव, साकोळ, तळेगाव, पांढरवाडी, शंभू उंबरगा, करवंदी, वाघनाळवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर्स जमीन सिंचनाखाली आली आहे. अनेक माळरान जमिनीवर नंदनवन फुलले आहे. त्यामुळे साकोळ परिसरात ग्रीनबेल्ट तयार झाला आहे. वर्षानुवर्षे कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकरी बागायतीकडे वळले. यंदा साकोळ मध्यम प्रकल्पाच्या भरोशावर अनेक शेतक-यांनी नवीन ऊसाची लागवड केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे मध्यम प्रकल्प कधी भरणार याकडे लक्ष लागले होते. दोन महिन्यांचा पावसाळा उलटला तरीही साकोळ मध्यम प्रकल्प ५० टक्क्यांच्या आतच होता. दरम्यान, नुकत्याच झालेल्या जोरदार पावसाने साकोळ मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे.

पाणीपातळी ५३३.१७ मीटर...

दोन महिने पावसाळा उलटला तरीही साकोळ मध्यम प्रकल्प ५० टक्क्यांच्या आतच होता. त्यामुळे मध्यम प्रकल्प कधी भरेल याकडे परिसरातील शेतक-यांचे डोळे लागले होते. तीन दिवसापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. प्रकल्पात ५३३.१७ मीटर एवढी पाणीपातळी झाली असल्याचे उपविभागीय अभियंता पी.व्ही. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे शेतक-यांतून समाधान व्यक्त होत आहे.

शेतक-यांनी केले जलपूजन...

साकोळ मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यावर तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी जवळपास १२५० एकर ऊसाची लागवड केली आहे. दरम्यान, मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांनी जल्लोषात जलपूजन केले. यावेळी पंडित लवटे, बाजार समितीचे सभापती लक्ष्मण बोधले, उपसभापती कल्याणराव बर्गे, प्रकाश पाटील बाकलीकर, जागले, ॲड. सुतेज माने, सुधीर लखनगावे, अमर आवाळे, निवृत्ती सूर्यवंशी, सूर्यकांत बानाटे, रमेश मोहिते, यशराज दुरूगकर, श्रीपती कुंभार, दत्तात्रय भोसले यांची उपस्थिती होती.