शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यांतील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST

जिल्ह्यातील हरंगुळ ७८.८, मुरुड ७९.८, तांदुळजा ६६.०, भादा ६५.३ आणि निलंगा या महसूल मंडळात ६८.८ मिमी पाऊस होऊन ...

जिल्ह्यातील हरंगुळ ७८.८, मुरुड ७९.८, तांदुळजा ६६.०, भादा ६५.३ आणि निलंगा या महसूल मंडळात ६८.८ मिमी पाऊस होऊन अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात तसेच गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश साठवण तलाव भरले आहेत. नदीनाल्यांना पाणी असून मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे. शिवाय मांजरा धरण ते साई नागझरी पर्यंतचे सर्व बॅरेजेस ओरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प असून त्यापैकी रेणा, व्हटी, साकोळ,घरणी, मसलगा, तिरू, देवर्जन हे सात मध्यम प्रकल्प भरले आहेत. तावरजा मध्यम प्रकल्प मात्र अद्याप भरलेला नाही. रेणा मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडून दुसऱ्यांदा विसर्ग करण्यात आला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस....

जिल्ह्यात आतापर्यंत ८०५.४ मिमी पाऊस झाला आहे. जो की वार्षिक सरासरी पेक्षा अधिक आहे. वार्षिक सरासरी ७८९.५५ मिमी असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ८०५.३ मिमी. पाऊस झाला आहे. लातूर तालुक्यात आतापर्यंत ७९६, औसा ७४०, अहमदपूर ९३५, निलंगा ६८२, उदगीर ८८८, चाकूर ८२२ रेणापूर, ८९२, देवणी ७४४, शिरूर आनंतपाळ ७२९ आणि जळकोट तालुक्यात ९२७ मिमी पाऊस झाला आहे.

गेल्या चोवीस तासांतील पाऊस...

गेल्या चोवीस तासांमध्ये लातूर जिल्ह्यात २५.४ मिमी पाऊस झाला आहे. त्यात लातूर तालुक्यात ५०.६०, औसा ३०.४, अहमदपूर २५.७, निलंगा ४०.५, उदगीर १.९, चाकूर २०.९ रेणापूर १०.५, देवणी १७.९६, आणि जळकोट तालुक्यात १.५ मिमी पाऊस झाला आहे. कोण जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 25.4 मिमी पाऊस झाला असून त्यात तांदुळजा,मुरुड, हरंगुळ, भादा आणि निलंगा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

अधून-मधून पावसाच्या सरी सुरूच....

जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस सुरूच असून शुक्रवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी सुरू होत्या. गुरुवारी रात्री लातूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने शेत शिवारामध्ये पाणी झाले आहे. शिवाय, सोयाबीन काढणीला आले, परंतु शेतात पाणी असल्याने ते काढता येत नाही, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अतिपावसामुळे खरिपाच्या पिकाचे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी विविध पक्ष संघटनांकडून होत आहे.