उदगीर : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली देवर्जन येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची कर्ज वसुली २०व्या वर्षीही १०० टक्के झाली आहे. एकविसाव्या वर्षी ही संस्था पुन्हा कर्जवसुलीत जिल्ह्यात प्रथम आणण्याचा विडा संचालक मंडळाने उचलला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे दिले जाणारे सन्मान व पुरस्कार दरवर्षी पटकावणारी ही एकमेव संस्था आहे.
देवर्जन मध्यम प्रकल्पामुळे परिसरातील ग्रीन बेल्टला कर्जपुरवठा करणारी ही एक महत्त्वाची संस्था आहे. सहकारी कायद्यानुसार नियम, अटी आणि ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या तत्वावर चालणारी ही संस्था आहे. सध्याची कर्जदार सभासद संख्या १,२५० असून, ५ कोटी ४२ लाखांचा कर्जपुरवठा केलेला होता. त्यांची सर्व कर्जदार सभासद शेतकऱ्यांनी वेळेवर उचल आणि वेळेवर कर्जाची परतफेड करत जूनमध्ये उचल रकमेचा ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भरणा करून, विसाव्या वर्षीही १०० टक्के कर्ज वसुलीत संस्था प्रथम आली आहे. देवर्जन सोसायटी दरवर्षी शेतकरी, कर्जदार सभासद, बिगर कर्जदार सभासदांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून सतत अग्रेसर राहते. यावर्षी कोरोना महामारीच्या काळात संस्थेच्या सर्व सभासदांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. यासाठी संस्थेचे गटसचिव राम मोतीराम बिरादार, जनरल मॅनेजर टी. एम. जाधव, वसुली अधिकारी व्ही. जी. शिंदे, व्यवस्थापक राजेश मुळे, क्षेत्रीय अधिकारी हणमंतराव पवार, शाखा तपासणीस आर. जे. पुरी, शाखा व्यवस्थापक विनोद लोखंडे, शंकर पात्रे, संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश खटके, अध्यक्ष सूर्यकांत रोडगे, उपाध्यक्ष गंगाधर कोपले, गटसचिव राम बिरादार, सोसायटीचे संचालक बालाजी बिरादार, अंतेश्वर रोडगे, मन्मथ रोडगे, गोपाळ येलमटे, दयानंद रोडगे, रमेश जाधव, संचालिका दैवशाला वाडीकर, शांताबाई सलगरे, लिपिक सुरेश खटके यांनी परिश्रम घेतले.